शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे, दिवाळीपूर्वी थकीत रकमेचा पहिला हप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:52 IST

कर्मचारी महासंघाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता

कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाचा थकीत रकमेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येईल, सेवानिवृत्त व मयत झालेल्या सफाई, झाडू कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यात येईल, आश्वासित प्रगती योजनेतील वेतन फरक देण्यात येईल यांसह १९ मागण्या मान्य झाल्याने शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी महासंघाने पुकारलेला संप मागे घेतला.कर्मचारी महासंघाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता. यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच कर्मचारी संपावर गेल्याने महापालिकेच्या विविध आस्थापनांचे काम बंद पडले. कर्मचाऱ्यांनी सकाळी महापालिका चौकात येऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देत त्यांच्याबरोबर चर्चा केली. यात कर्मचाऱ्यांच्या १९ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता संप मागे घेण्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांनी केली. यावेळी संजय भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी संपावर.. दुपारनंतर कर्मचारी कामावरमहापालिकेचे कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच संपावर गेल्याने शहरासह उपनगरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले होते. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत शहरातील कचऱ्याचा उठावच झाला नाही. मात्र, संप मागे घेतल्यानंतर हे सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. रात्री साडेसात वाजेपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणच्या कचऱ्याचा उठाव केला. विशेष म्हणजे मिळेल ती यंत्रणा घेऊन कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कचरा उचलला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation Employees End Strike After Demands Met

Web Summary : Kolhapur Municipal Corporation employees called off their strike after assurances regarding the seventh pay commission arrears and other demands. Work resumed swiftly, with garbage cleanup completed by night.