कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २ मार्चपासून सकाळ-संध्याकाळ, नेमकं वेळापत्रक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:04 IST2026-02-12T12:03:51+5:302026-02-12T12:04:26+5:30

सध्या कोल्हापुरातून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमान सेवा सुरू आहे

Kolhapur-Mumbai flight service morning, evening from March 2nd | कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २ मार्चपासून सकाळ-संध्याकाळ, नेमकं वेळापत्रक..जाणून घ्या

संग्रहित छाया

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर येत्या २ मार्चपासून सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रांत विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी दिली. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस सायंकाळची कोल्हापूर-मुंबईविमानसेवा असेल, पण लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. 

सध्या कोल्हापुरातून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू आहे. २ मार्चपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळच्या सत्रातील स्टार एअरवेजचे विमान प्रवासी सेवा देईल. लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल. 

सायंकाळी साडेचारऐवजी सायंकाळी सात-साडेसातनंतर मुंबईहून विमान उड्डाण करेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. सध्या कोल्हापुरातून मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमान सेवा सुरू आहे.

असे असेल वेळापत्रक

  • विमान कंपनीचे नाव : स्टार एअरवेज
  • प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी ४:३० वाजता मुंबईतून स्टार एअरवेजचे विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल. ते ५:३५ ला कोल्हापुरात येईल.
  • सायंकाळी ६:०५ वा. कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईच्या दिशेने विमानाचे उड्डाण होईल. ते विमान सायंकाळी ७ :१० मिनिटांनी मुंबईला पोहोचेल.


या सुरू आहेत विमानसेवा

विमानसेवा - वेळ

  • कोल्हापूर-हैदराबाद :   सकाळी ८:४५-१०:००
  • कोल्हापूर-मुंबई :  सकाळी ११:१५-दुपारी १२:२०
  • कोल्हापूर -अहमदाबाद :  दुपारी २:४०-दुपारी ४:१०
  • कोल्हापूर-बंगळुरु : दुपारी ४:४०-सायंकाळी ६:२०

Web Title : कोल्हापुर-मुंबई विमान सेवा 2 मार्च से सुबह-शाम शुरू

Web Summary : कोल्हापुर-मुंबई विमान सेवा 2 मार्च से सुबह और शाम को शुरू होगी। शुरुआत में, शाम की उड़ानें सप्ताह में दो बार होंगी, जल्द ही दैनिक विस्तार होगा। वर्तमान उड़ानें मुंबई, बैंगलोर, हैदराबाद, तिरुपति और अहमदाबाद के लिए हैं। नए शेड्यूल में 4:30 बजे मुंबई से प्रस्थान, 6:05 बजे कोल्हापुर से वापसी शामिल है।

Web Title : Kolhapur-Mumbai Flight Service to Start Morning-Evening From March 2nd

Web Summary : Kolhapur-Mumbai flights will operate morning and evening from March 2nd. Initially, evening flights are twice weekly, expanding to daily soon. Current flights serve Mumbai, Bangalore, Hyderabad, Tirupati, and Ahmedabad. New schedule includes 4:30 PM Mumbai departure, 6:05 PM Kolhapur return.