शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा ५ डिसेंबरपासून, विजेत्यास दोन लाखाचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 17:52 IST

गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्या जोडीला महिला कुस्ती स्पर्धा आणि हिंदकेसरी कमलजितसिंह पंजाब विरुद्ध मोतीबाग तालमीचा बालारफीक शेख यांच्यातील बेमुदत निकाली कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजेत्यास दोन लाख, तर उपविजेत्यास एक लाखाचे बक्षीसकमलजितसिंग विरुद्ध बालारफीक बेमुदत कुस्ती

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्या जोडीला महिला कुस्ती स्पर्धा आणि हिंदकेसरी कमलजितसिंह पंजाब विरुद्ध मोतीबाग तालमीचा बालारफीक शेख यांच्यातील बेमुदत निकाली कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे.

रोख रकमेचा वर्षाव करणाऱ्या  या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत जिंकणाऱ्या मल्लांना अनुक्रमे दोन लाख, एक लाख व पन्नास हजार रुपये बक्षिसादाखल मिळणार आहेत. महापौर चषकाच्या मानकरी मल्लाला चांदीची गदा, प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. महापौर चषक गटात खेळण्यासाठी ८५ किलोच्यावरील मल्लांना प्रवेश देण्यात येणार आहे.

महापौर हसिना फरास व राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. कुस्तीमध्ये कोल्हापूरचे नाव अव्वलस्थानी आहे. त्यामुळे महानगरपालिकेने ‘कुस्ती पंढरी’ म्हणून असलेला नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न केला; परंतु गेल्या दहा वर्षांपासून ही स्पर्धा बंद होती, ती आता सुरू होत असल्याचा आपणाला आनंद होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौर चषक कुस्ती स्पर्धा ही कोेल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने होत असून, महापौर चषकाची प्रथम क्रमांकाची कुस्ती पंधरा मिनिटांची होईल. त्यामध्ये बरोबर राहिली तर पाच मिनिटे वाढवून दिली जातील. त्यानंतरही बरोबरीत राहिली तर पुढील वेळेत जो मल्ल पहिला गुण मिळवेल त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल, असे अ‍ॅड. आडगुळे यांनी सांगितले.

यंदा प्रथमच महिला कुस्तीगिरांना सुद्धा स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येत आहे. महिलांसाठी ५५ किलो, ६० किलो व ६० किलोंच्यावरील खुला अशा तीन गटांत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. महिला महापौर कुस्तीत ६० किलोंच्या वरील महिला कुस्तीगिरांना प्रवेश दिला जाईल.

या स्पर्धेसोबतच हिंदकेसरी मल्ला कमलजितसिंह पंजाब विरुद्ध न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल भगवंत केसरी बालारफीक शेख यांच्यात बेमुदत कुस्ती खेळविली जाणार आहे. या दोन्ही मल्लांना दोन लाख ८५ हजारांचे मानधन विभागून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, महान भारत केसरी दादू चौगुले, हिंद केसरी विनोद चौगुले, संभाजी वरुटे, नामदेव मोळे, आदिल फरास उपस्थित होते.

वजन गट आणि बक्षिसे - 

-महापौर केसरी - ८६ किलोंच्यावरील गट - विजेता दोन लाख

  1. उपविजेता एक लाख, तृतीय ५० हजार रुपये
  2. ८५ किलो - ३१ हजार, २० हजार व १५ हजार रुपये.
  3.  ७४ किलो - २० हजार, १५ हजार व १० हजार रुपये.
  4. ६५ किलो - १५ हजार, १० हजार व ७ हजार रुपये.
  5. ६१ किलो - १२ हजार, ८ हजार, ५ हजार रुपये.
  6.  ५७ किलो - १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपये.

 महिला गट - 

  1. महापौर केसरी (६० किलोंच्यावरील गट)- विजेता ५० हजार,
  2. उपविजेता २५ हजार, तृतीय १५ हजार रुपये.
  3. ६० किलो वजन गट - १५ हजार, ७ हजार, ५ हजार रुपये.
  4.  ५५ किलो वजनगट - १० हजार, ५ हजार , ३ हजार रुपये.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSportsक्रीडा