कोल्हापूर : कोल्हापूरच्यामहापौर, उपमहापौरपदाची निवडणूक दि. ३० किंवा दि. ३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृत घोषणा केली नसली, तरी नगरविकास विभागाने तसा कच्चा कार्यक्रम ठरविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने ते राज्यात परतल्यानंतरच निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले.राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कच्चा कार्यक्रम त्याच्या तारखेसह तयार करून ठेवला आहे. त्याची रीतसर घोषणा होण्याआधीच तो कोणी तरी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा कार्यक्रम अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले.
वाचा : लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून कोल्हापूर महानगरपालिका नगरसचिव सुनील बिद्रे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयास पत्र पाठवून नवनिर्वाचित सदस्यांची पहिल्या बैठकीत महापौर, उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित करून द्यावी, अशी विनंती केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही निरोप येतो का, याची वाट पाहिली, परंतु तिकडून कोणताही निरोप आला नाही.जोपर्यंत विभागीय आयुक्तांकडून सभेची तारीख व पीठासन अधिकाऱ्यांचे नाव कळविले जाणार नाही, तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडून महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी सांगितले.
Web Summary : Kolhapur Municipal Corporation's mayoral election is likely on January 30th or 31st. The official announcement from the Divisional Commissioner's office is awaited, pending the Chief Minister's return. The Municipal Corporation awaits the date and presiding officer's name from the Divisional Commissioner before announcing the election program.
Web Summary : कोल्हापुर महानगरपालिका में महापौर का चुनाव 30 या 31 जनवरी को होने की संभावना है। विभागीय आयुक्त कार्यालय से आधिकारिक घोषणा का इंतजार है, जो मुख्यमंत्री की वापसी तक लंबित है। चुनाव कार्यक्रम की घोषणा से पहले महानगरपालिका विभागीय आयुक्त से तिथि और पीठासीन अधिकारी के नाम का इंतजार कर रही है।