शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विजयाच्या घोषणांनी दणाणला ‘अजिंक्यतारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 15:54 IST

लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील गटाने ‘आमच ठरलय’ या घोषणेप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

ठळक मुद्देमंडलिक यांच्या विजयानंतर सतेज पाटील समर्थकांचा जल्लोष ; मोठा पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील गटाने ‘आमच ठरलय’ या घोषणेप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सकाळी साडे आठ वाजल्यापासून आमदार पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

फटक्यांची अतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळण करीत गुरूवारी दुपारी जल्लोष केला.आमदार पाटील व खासदार धनंजय महाडीक यांच्यात विधानसभा निवडणूकीपासून हाडवैर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार पाटील यांनी ‘आमच ठरलय’ ची घोषणा दिली होती. यानूसार कार्यकर्त्यांनी महिनाभर मतदारसंघ पिंजून काढला.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून मंडलिकांचा प्रचार केला. गुरूवारी सकाळी रमणमळा येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर साडेआठच्या दरम्यान पोस्टल निकालाचा कल जसा बाहेर येवू लागला. त्यात मंडलिक यांनी आघाडी घेतल्याचे कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर साडेनऊ वाजता पुन्हा मंडलिकांनी महाडीक यांच्यावर आघाडी घेतल्याचे समजले. त्यानूसार कार्यकर्ते आमदार पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील ‘अजिंक्यतारा’ या कार्यालयाकडे येवू लागले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापूर मतदारसंघाचे निकालाचे चित्र स्पष्ट झाले.

त्यानंतर मोटारसायकलचे सायलेन्सर काढून कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने दाखल झाले. यावेळी आमदार पाटील यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यात अतिषबाजीसह गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, कारभारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पाटील यांच्या कार्यालयासमोर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.जल्लोष नकोराज्यासह संपूर्ण देशात काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी अजिंक्यतारा समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष अथवा गुलालाची उधळण करू नये अशी सुचना केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जावून जल्लोष करावा. असे आवाहन गोकूळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले व विनय सुर्यवंशी यांनी केले.विधानसभेतही पाडायच हायअजिंक्यतारा येथे दुपारनंतर कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. बाबासाहेब चौगुले यांनी आवाहन करूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेरीस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरूच ठेवला. यात एका कार्यकर्त्याने लोकसभेत महाडीक विषय संपला आहे. आता त्यांना विधानसभेतही पाडायच हाय. येथे जल्लोष करू नका असे आवाहन ही केले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आवाहनानंतरकार्यकर्त्यांची गर्दी वाढतच गेली आणि कारभारी कार्यकर्त्यांना ती हटविणेही दिवसभर शक्य झाले नाही. 

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल