Kolhapur-Local Body Election: कुरुंदवाडमध्ये अपक्षामुळे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत, चिन्हाविना प्रचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:17 IST2025-11-22T16:17:20+5:302025-11-22T16:17:38+5:30
सासू विरूद्ध नातसून लढत, सख्ख्या जावा आमने-सामने

Kolhapur-Local Body Election: कुरुंदवाडमध्ये अपक्षामुळे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत, चिन्हाविना प्रचार सुरू
कुरुंदवाड : येथील पालिका निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी ४० नगरसेवक, तर ३ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५ पक्षांसह ६१ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी एका अपक्षामुळे चौरंगी लढत होणार आहे.
दरम्यान निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडी, काँग्रेस व भाजपा अशी तिरंगी लढत निश्चित झाली आहे. शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस असल्याने आपल्याला अडचणीचे ठरतील अशा अपक्ष उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षीय उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत अटोकाट प्रयत्न झाल्याचे चित्र होते.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
मनीषा डांगे (शाहू आघाडी), योगिनी पाटील (काँग्रेस), समीरा जोशी (भाजपा), परवीन पठाण (अपक्ष)
सासू विरूद्ध नातसून लढत
प्रभाग ७ मध्ये तस्मिया बागवान (नातसून - शाहू आघाडी) विरुद्ध आयेशा बागवान (सासू - काँग्रेस) अशी लढत होत आहे.
सख्ख्या जावा आमने-सामने
प्रभाग ८ मध्ये शाहिदा पठाण (अपक्ष) विरुद्ध रजिया बेगम पठाण (शाहू आघाडी)
- एकाच कुटुंबातील काकू-पुतण्या शाहू आघाडीतून नशीब अजमावत आहेत.
- प्रभाग ४ मधून माजी नगराध्यक्षा सुनंदा आलासे तर प्रभाग ५ मधून अक्षय आलासे निवडणूक लढवत आहेत.
चिन्हाविना प्रचार सुरू
माघार होऊन उमेदवारी निश्चित झाली आहे. पक्षीय उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. मात्र अपक्ष उमेदवारांना २६ तारखेला निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळणार असल्याने चिन्हाविना प्रचार सुरू आहे.