कळंबा कारागृहात कैद्याकडे पिस्तुल, मोबाइल; वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 14:06 IST2018-11-28T13:41:39+5:302018-11-28T14:06:33+5:30
सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील संशयित संतोष पोळ हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तुल हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी (27 नोव्हेंबर) व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

कळंबा कारागृहात कैद्याकडे पिस्तुल, मोबाइल; वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील संशयित संतोष पोळ हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तुल हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी (27 नोव्हेंबर) व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. कारागृहात त्याच्याकडे पिस्तुल आणि मोबाइल आला कुठून यासंबंधी बुधवारी (28 नोव्हेंबर) वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम विभाग कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे या कोल्हापुरात दाखल झाल्या आहे. त्यांच्याकडून कैदी पोळची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले आहेत. याप्रकरणी दुपारी 4 वाजता साठे प्रसारमाध्यमांसोबत बोलणार आहेत.