कोल्हापूर : तीन लाख अपात्र खात्यांची फेरतपासणी : कोल्हापूर विभागातील कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:41 IST2018-09-20T00:34:40+5:302018-09-20T00:41:20+5:30
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या

कोल्हापूर : तीन लाख अपात्र खात्यांची फेरतपासणी : कोल्हापूर विभागातील कर्जमाफी
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खात्यांची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील एकूण तीन लाख खातेदारांचा समावेश आहे.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ, या निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते; पण आता कुटुंबातील इतरांनाही लाभ देण्याचा निर्णय झाल्याने अपात्र खात्यांच्या फेरतपासणीचे आदेश दिले असून, कोल्हापूर विभागातील तीन लाख खात्यांची तपासणी तालुकास्तरीय समितीने सुरू केली आहे.
राज्य सरकारने जून २०१७ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, दीड लाखावरील शेतकºयांना एकरकमी परतफेड योजना व नियमित परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदान अशी कर्जमाफीची योजना आणली. निकषानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला. त्यामुळे कुटुंबातील इतर खातेदार लाभांपासून वंचित राहिले. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत चार लाख ६९ हजार ३४९ खातेदारांना ९४८ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे; पण लाखो शेतकरी वेगवेगळ्या निकषांत आडकल्याने ते वंचित राहिले. सरकारने मध्यंतरी या निकषांत बदल करून कुटुंबातील सर्वच व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतला.
कुटुंब निकष आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या राज्यातील २८ लाख खातेदारांचा डाटा पुन्हा जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे फेरतपासणीसाठी पाठविला आहे. कोल्हापूर विभागात तीन लाख १ हजार १६४ असे खातेदार आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात सर्वाधिक एक लाख ३३ हजार २८२, सांगलीत ७६ हजार ८१९ तर साताºयात ९१ हजार ६३ खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांच्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे तपासणीसाठी आल्या आहेत. त्यांची तपासणी करून पात्र खातेदारांची यादी १० आॅक्टोबरपर्यंत सरकारकडे सादर करायची आहे.
त्याशिवाय २०१६-१७ या आर्थिक वर्षातील ज्या खातेदारांना कर्जमाफीचा लाभ झाला, त्यांना पीक व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा बॅँकांनी केला का? याची तपासणी करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत. त्याचबरोबर शेतकरी पात्र झाले; पण त्यांना खरोखरच पैशांचा लाभ झाला का? याची शहानिशाही लेखापरीक्षक करणार आहेत. त्यासाठी विकास संस्थांसह शेतकºयांना अर्थपुरवठा करणाºया संस्थांसाठी १ ते ६६ कॉलमचा नमुना दिला आहे. त्यांनी पात्र झालेल्या खातेदारांची संपूर्ण माहिती भरायची, लेखापरीक्षक त्याची तपासणी करणार असून त्याचा अहवाल चार दिवसांत आयुक्तांना द्यायचा आहे.
कोल्हापूर विभागामध्ये
आतापर्यंत झालेली कर्जमाफी
जिल्हा पात्र खातेदारांची संख्या कर्जमाफीची रक्कम
कोल्हापूर एक लाख ७० हजार ९०१ ३१४ कोटी
सांगली एक लाख १४ हजार ५९१ २५९ कोटी
सातारा एक लाख ८३ हजार ८५७ ३७४ कोटी
एकूण ४ लाख ६९ हजार ३४९ ९४८ कोटी