कोल्हापूर : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:11 IST2018-04-20T17:11:27+5:302018-04-20T17:11:27+5:30
पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केली. सतीश शंकर गोंधळे (वय ३७, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर) असे त्यांचे नाव आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह प्रियकरावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोल्हापूर : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या
कोल्हापूर : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केली. सतीश शंकर गोंधळे (वय ३७, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर) असे त्यांचे नाव आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह प्रियकरावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
संशयित प्रिया सतीश गोंधळे (वय ३५), तिचा प्रियकर विनायक कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत. प्रिया व विनायक यांच्या प्रेमसंबंधामुळे सतीश गोंधळे यांना मानसिक त्रास होत होता. दोघेही पळून गेल्याने ते अपमानित झाले.
या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा भाऊ चिदानंद शंकर गोंधळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत.