शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : होमिओपॅथीलाही लागू होणार आरोग्य विमा : श्रीपाद नाईक यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 15:45 IST

होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्देहोमिओपॅथीलाही लागू होणार आरोग्य विमा : श्रीपाद नाईक यांची ग्वाही  मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रिटमेंट सेंटरचा वास्तू स्थलांतर सोहळा

कोल्हापूर : होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली.कावळा नाका येथील मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रीटमेंट सेंटरच्या वास्तू स्थलांतर सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.

प्रमुख उपस्थिती आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. चंद्रदीप नरके, ‘मॉडर्न होमिओपॅथी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार माने, व्यवस्थापकीय संचालक प्रेमकुमार माने, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. अजय ताडे (पुणे), डॉ. विकास मोहिते (कऱ्हाड ) आदींची होती.मंत्री नाईक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या वास्तूचे उद्घाटन व कोनशिला अनावरण झाले.मंत्री नाईक म्हणाले, होमिओपॅथी रिसर्च सेंटरचे डॉ. विजयकुमार माने यांनी वीस वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. होमिओपॅथी गावागावात पोहोचविण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे. भारतात जितके होमिओपॅथीवर विश्वास ठेवून लोक उपचार घेतात त्यातुलनेत जगात इतर ठिकाणी हे प्रमाण कमी आहे.सामान्य माणसाला शस्त्रक्रीया परवडत नाही, परंतु होमिओपॅथीच्या माध्यमातून विनाशस्त्रक्रीया व कमी खर्चात उपचार केले जातात हे कौतुकास्पद आहे. रोगाला मूळासकट उखडून टाकण्याची ताकद या पॅथीमध्ये आहे.महापौर यवुलजे यांनी ‘मॉडर्न होमिओपॅथी’च्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर नेल्याबद्दल डॉ. माने यांचे कौतुक केले.आ. मिणचेकर यांनी होमिओपॅथीसाठी सरकारने किमान ५० टक्के अनुदान देण्याची मागणी केली.प्रास्ताविकात डॉ. विजयकुमार माने म्हणाले, होमिओपॅथीच्या माध्यमातून केलेले संशोधन तळागाळात पोहोचविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याचबरोर ‘मॉडर्न होमिओपॅथी’च्या माध्यमातून देशभरात शिबिरे घेतली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमिओपॅथीला विशेष महत्व दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे.यावेळी विमल माने, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. गिरीष कोरे, डॉ. श्रीधर पाटील, डॉ. शिरिष पाटील, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते. प्रेमकुमार माने यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरministerमंत्री