कोल्हापूर : चार लाखाचे वायर बंडल चोरीस, टाकाळामधील घटना ; वॉचमनवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:23 IST2018-12-06T16:22:47+5:302018-12-06T16:23:45+5:30
कोल्हापूर : टाकाळा येथे एका अर्पाटमेंटच्या गोडावून मधील सुमारे चार लाखाचे १२९ वायरचे नग बंडल चोरीस गेले. ही घटना ...

कोल्हापूर : चार लाखाचे वायर बंडल चोरीस, टाकाळामधील घटना ; वॉचमनवर संशय
कोल्हापूर : टाकाळा येथे एका अर्पाटमेंटच्या गोडावून मधील सुमारे चार लाखाचे १२९ वायरचे नग बंडल चोरीस गेले. ही घटना दोन महिन्यापुर्वी ते २२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत घडली.
याबाबत विवेकानंद वसंतराव पाटील (वय ५३, रा . पुष्कराज बिल्डिंग, टाकाळा रोड, ) यांनी राजारामपुरी पोलिसात बुधवारी (दि. ५) रात्री फिर्याद दिली. याप्रकरणी पाटील यांनी वॉचमन कमलेस उर्फ कल्लाप्पा मडिवालर (रा. पुष्कराज बिल्डिंग तळमजल्यात, मूळ रा. तूरणूर , ता. रामदुर्ग, जि. बेळंगाव) याच्यावर संशय व्यक्त केला आहे.
त्यामुळे संशयित कमलेस मडिवालर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मडिवालर हा गेल्या वर्षापासून वॉचमन नोकरीस आहे.तो त्याच इमारतीच्या तळमजल्यावर राहतो . तळमजल्यावरील गोडावूनमध्ये कपाटाच्या चाव्या असतात. याची नोंद पोलिसात झाली.