कोल्हापूर महापूर : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात केली पुराची पाहणी, पुरग्रस्तांना दिला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 16:06 IST2019-08-08T15:49:48+5:302019-08-08T16:06:55+5:30

कोल्हापुरातील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन देत दिलासा दिला.

kolhapur flood : Maharashtra CM Devendra Fadnavis visited Shivaji Nagar area in Kolhapur | कोल्हापूर महापूर : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात केली पुराची पाहणी, पुरग्रस्तांना दिला दिलासा

कोल्हापूर महापूर : मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात केली पुराची पाहणी, पुरग्रस्तांना दिला दिलासा

कोल्हापूर : कोल्हापुरातील पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांना मदतीचे आश्वासन देत दिलासा दिला.

 शिवाजी पूल येथून पुराची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू विद्यालय, न्यू पॅलेसकडे रवाना झाले. तेथील पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यानी मदतीचा दिलासा दिला. 


न्यू पॅलेस कोल्हापूर  येथील छत्रपती शाहू विद्यालयात पुरामुळे बाधित लोकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस  केली.  छत्रपती शाहू महाराज यांनी पुरग्रस्तांसाठी केलेल्या  या व्यवस्थेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

Web Title: kolhapur flood : Maharashtra CM Devendra Fadnavis visited Shivaji Nagar area in Kolhapur