Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:47 PM2021-07-24T15:47:36+5:302021-07-24T15:49:28+5:30

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत.

Kolhapur Flood : Idol example of hundu-muslim helpness in floods of kolhapur, and rows of people were sitting in the madarasha in kolhapur shiroli | Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

Next
ठळक मुद्देसरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत.

कोल्हापूर - पावसाळा अन् दुर्घटना हे जणू आता दुर्दैवी समीकरण बनलं आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो, गावं पाण्याखाली जातात, दरडी कोसळतात आणि लोकांचा आक्रोश पाहताना डोळे पाणावतात. आता, पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीत हाहाकार पाहायला मिळत आहे. मात्र, दुर्घटना आणि संकाटात जाती-धर्माच्या भिंती कोसळल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. आता, कोल्हापुरातीही तोच प्रत्यय नागरिकांना आला आहे. 

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाड्यांमधल्या प्रवाशांची अन्न-पाण्याविना मोठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिरोलीमधील मुस्लिम बांधव पुढे आले आहेत. शिरोलीतील मुस्लिम बांधवांनी वाहनांमध्ये अडकून पडलेल्या या प्रवाशांची जेवणाची आणि निवासाची सोय स्थानिक मदरशामध्येच केली. जवळपास 200 हून अधिक प्रवाशांना शिरोलीतील या मदरशामध्ये आसरा मिळाला आहे. एकूण 4 एसटी बसेस आणि 6 खासगी कारमधील प्रवाशांची या मदरशामध्ये सोय करण्यात आली आहे.

पुणे, देवगड, औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठ्या संख्येने आलेली वाहनं महापुरामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एसटी बसेस आणि अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील महामार्गावर लागल्या आहेत. या मदरशात मैनुद्दिन मुल्ला, शकील किल्लेदार आणि त्यांच्या गटानं प्रवाशांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं. 

सर्वोतोपरी मदतीसाठी आम्ही सज्ज

“राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांची सोय मदरशांमध्ये केले आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवले आहेत. चहा-नाश्ता, दोन वेळेचे जेवण याबरोबर त्यांच्या निवासाची सोय केली आहे. त्यांना कशाची कमतरता पडू नये याची काळजी आम्ही सर्वतोपरी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, शकडो जाती-धर्माच्या लोकांनी नबलेला भारत संकटसमयी विविधतेतील एकता जगाला दाखवून देतो. याच मदतीच्या भावनेतून कोरोना संकटातही देशाने जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

Read in English

Web Title: Kolhapur Flood : Idol example of hundu-muslim helpness in floods of kolhapur, and rows of people were sitting in the madarasha in kolhapur shiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app