कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:24 PM2017-12-26T15:24:59+5:302017-12-26T15:55:23+5:30

जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

Kolhapur: Dakkal gets a lot of shelter, Chandrakant Das's hand has many handwriting hands | कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

कोल्हापूर : दिनकरला मिळाला हक्काचा निवारा, चंद्रकांतदादांच्या पुढाकाराला अनेक दातृत्वाचे हात

Next
ठळक मुद्देजीवबा नाना पार्क येथे हक्काच्या घराचे स्वप्न समाजातील अनेक दातृत्वाचे हात नवीन घरात संपर्क कार्यालयनोकरीही कायमची व्हावी

कोल्हापूर : जीवरक्षक म्हटले की करवीर तालुक्यातील कांडगावचा सुपुत्र दिनकर कांबळेचे नाव चटकन समोर येते. यामागे दिनकरचे कर्तृत्व आणि त्याग आहे. पण गेली अनेक वर्षे तो हक्काच्या घरापासून वंचित होता, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला, त्यास समाजातील अनेक दातृत्वाचे हात लागले आणि दिनकरचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.

समाजात अनेकजण सामाजिक कामे करतात, पण त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असे काम दिनकर कांबळे करीत आहेत. मदत करायची राहू दे, पण त्या घटनेकडे बघायचेही धाडस होत नाही. अशी कामे करण्यासाठी पदोपदी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या फारच कमी. त्यामध्ये दिनकरचे नाव अव्वल घ्यावे लागेल.

गेली २२ वर्षे अविरतपणे हे काम सुरू आहे. त्यातून आपल्या पदरात काय पडणार, माझ्या कुटुंबाचे काय होणार, हे केल्यानंतर समाज मला काय देणार, हे विचार दिनकरच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. त्यामुळेच आज एका विशिष्ट उंचीवर त्याचे नाव आहे.


सामाजिक काम करत असताना त्याचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, कांडगावमध्ये राहते घर आहे. पण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एखादी दुर्घटना घडली, तर तेथून येताना वेळ जातो. यासाठी शहरात घराची गरज होती. अनेकांनी घरासह नोकरीची आश्वासने दिली, पण ती कधी हवेत विरली, हे दिनकरलाही कळले नाही.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिनकरला हक्काचा निवारा करून द्यायचा, हा निर्णय घेतला आणि जीवबा नाना पार्क परिसरात ‘वन बीएचके’ घराचे बुकिंगही केले. मंत्री पाटील यांच्या या निर्णयाला समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे येत असल्याने लवकरच दिनकरला हक्काचा निवारा मिळणार आहे.

नोकरीही कायमची व्हावी

दिनकर कांबळे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. मंत्री पाटील यांनी त्याच्या कायमच्या निवाऱ्यांची सोय केली, त्याप्रमाणे नोकरीही कायम करावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नवीन घरात संपर्क कार्यालय

केवळ राहण्यासाठी नवीन घराचा वापर दिनकर करणार नाही. तिथे संपर्क कार्यालय सुरू केले जाणार असून, तिथे नागरिकांना थेट संपर्क साधता येणार आहे.

 


शहरात राहात नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ पोहोचता येत नाही. ही गरज ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घर देऊन खूप मोठे काम केले. हे घर नसून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय राहणार आहे.
- दिनकर कांबळे, जीवरक्षक
 

 

Web Title: Kolhapur: Dakkal gets a lot of shelter, Chandrakant Das's hand has many handwriting hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.