शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

कोल्हापूर : दादांनी मदत केलीय,भाजपचा महापौर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:04 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले, तर पालकमंत्र्यांनी चॉकलेट देऊन नगरसेवकांचे तोंड गोड केले. यावेळी झालेली राजकीय टोलेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली.

ठळक मुद्दे दादांनी मदत केलीय,भाजपचा महापौर करानगरसेवकांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार : पद वाचविल्याबध्दल कृतज्ञता

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार घेऊन गेले वर्षभर तणावाखाली वावरणाऱ्या महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुष्पगुच्छ देऊन नगरसेवकांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले, तर पालकमंत्र्यांनी चॉकलेट देऊन नगरसेवकांचे तोंड गोड केले. यावेळी झालेली राजकीय टोलेबाजी मात्र चर्चेचा विषय ठरली.पद रद्द झाल्यावर नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन ‘आम्हाला वाचवा’अशी विनंती केली. पाटील यांनी मदतीची ग्वाही दिली होती. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला; त्यामुळे सर्व नगरसेवकांना जीवदान मिळाले.

आदिल फरास यांनी आभार मानताना ‘आम्ही आपले ऋणी आहोत’ असे म्हणताच राजू ऊर्फ सतीश घोरपडे यांनी ‘दादांनी मदत केलीय, आता भाजपचा महापौर करा’ असा सल्ला दिला. त्यावेळी सर्वच हास्यसागरात बुडाले. त्याचवेळी प्रा. जयंत पाटील यांनी महापौर नको, दादांनाच खासदार करूया असे सांगितले, तेव्हा मंत्री पाटील यांनी नम्रतापूर्वक हात जोडून या सूचनेला नकार दिला.यावेळी स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक सचिन पाटील, नियाज खान, संदीप नेजदार, किरण शिराळे, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विनायक फाळके उपस्थित होते.

जयंत पाटील यांचे श्रेयया प्रकरणी प्रा.जयंत पाटील यांनी नेटाने पाठपुरावा केल्यामुळे तुमचे नगरसेवक पद आणि तुमच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सदस्यांचे पद वाचल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर