शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात वाऱ्यामुळे दहा वृक्ष कोसळले, विद्युत पुरवठाही खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना बसला. शहराच्या विविध भागात दहा वृक्ष कोसळले, तर अनेक ठिकाणी ...

कोल्हापूर : जोरदार वारे आणि पावसाचा फटका शहरातील वृक्षांना बसला. शहराच्या विविध भागात दहा वृक्ष कोसळले, तर अनेक ठिकाणी फांद्या तुटल्या. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन कोसळलेले वृक्ष रस्त्यातून बाजूला केले.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊ घालेल्या चक्रीवादळामुळे शनिवारपासून शहरात जोरदार वारे वाहत आहेत. रविवारीही दिवसभर जोरदार वारे वाहत होते. तसेच संततधार पाऊस कोसळत होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. अधूनमधून मोठी सर येत होती. रविवारी दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. जोराच्या वाऱ्यामुळे शहरातील उद्यमनगर, ताराबाई पार्क, महाडिक पेट्रोल पंप, हॉकी स्टेडियमरोड, राजारामपुरी १० वी गल्ली, जरगनगर, शाहुपरी गुजराती हायस्कूल, सदरबाजार या परिसरातील वृक्ष कोसळले. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत.

सदरबाजार परिसरात जिल्हा परिषद क्वॉर्टर्स असून तेथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या घरावर नीलगिरीचे एक उंच झाड कोसळले. त्यामुळे घराचे किरकोळ नुकसान झाले. मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन कोसळलेले झाड बाजूला केले. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे रेनट्री, गुलमोहराच्या झाडांची पाने, फुले, शेंगा रस्त्यावर पडून त्यामुळे रस्त्यावर दलदल झाली होती.

कोल्हापूर शहर परिसरात वाऱ्याचा वेग तुलनेने थोडा कमी झाल्यानंतर दोन वाजता पावसाचा जोर चढला. हा जोर सायंकाळपर्यत टिकून होता. दोन दिवस जोराने वारे, संततधार पाऊस कोसळत असला तरी हवेतील उष्मा काही कमी झालेला नाही. पावसाबरोबरच उष्माही तेवढाच जाणवत होता.

-विद्युत पुरवठाही खंडित -

जोरदार वाऱ्यामुळे शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा खंडित केला जात होता.