कोल्हापूर : बाटली डोक्यात फोडल्याने तरुण जखमी, तिघांवर गुन्हा : राजेंद्रनगर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:59 IST2018-10-12T17:57:41+5:302018-10-12T17:59:54+5:30
राजेंद्रनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दारूची बाटली डोक्यात फोडल्याने तरुण जखमी झाला. हेमंत लाला बिरंजे (वय ३१, रा. नवीन वसाहत, राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित संग्राम सोनवणे (रा. दत्त मंदिराशेजारी राजेंद्रनगर) याचेसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. १०) रात्री घडली.

कोल्हापूर : बाटली डोक्यात फोडल्याने तरुण जखमी, तिघांवर गुन्हा : राजेंद्रनगर येथील घटना
कोल्हापूर : राजेंद्रनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दारूची बाटली डोक्यात फोडल्याने तरुण जखमी झाला. हेमंत लाला बिरंजे (वय ३१, रा. नवीन वसाहत, राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित संग्राम सोनवणे (रा. दत्त मंदिराशेजारी राजेंद्रनगर) याचेसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. १०) रात्री घडली.
अधिक माहिती अशी, हेमंत बिरंजे हा राजेंद्रनगर येथील फॅब्रिकेटर्सच्या कारखान्यात नोकरीस आहे. बुधवारी रात्री कारखाना बंद केलेनंतर वेल्डिंग मशीन कारखान्यात ठेवताना बाहेर कट्ट्यावर संशयित तिघेजण दारू पित बसले होते.
त्यांना अडचण होतेय, थोडे बाजूला व्हा, असे म्हटल्याच्या रागातून तिघांनी बिरंजे याच्याशी वादावादी करून दारूची रिकामी बाटली डोक्यात फोडून जखमी केले. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.