कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर, ११ हजार रुपये क्विंटल कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:41 AM2019-12-05T11:41:05+5:302019-12-05T11:45:51+5:30

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याने उच्चांक गाठला. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार रुपये कांद्याला दर मिळाला असून, गेल्या वर्षभरातील हा विक्रमी दर आहे. पाच हजार पिशव्यांची आवक झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये राहिला.

Kolhapur Bazar Samiti Rs. 3,000 quintal onion | कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर, ११ हजार रुपये क्विंटल कांदा

कोल्हापूर बाजार समितीत बुधवारी कांद्याला विक्रमी दर मिळाला. विक्रमी प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर मिळणाऱ्या कांद्यासह शेतकरी. (नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर, ११ हजार रुपये क्विंटल कांदासरासरी ४५०० रुपये : पाच हजार पिशव्यांची आवक

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याने उच्चांक गाठला. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार रुपये कांद्याला दर मिळाला असून, गेल्या वर्षभरातील हा विक्रमी दर आहे. पाच हजार पिशव्यांची आवक झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये राहिला.

बाजार समितीत सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक किलोही कांदा समितीत येत नाही. राज्यातील इतर समित्यांपेक्षा कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची नेहमीच या समितीला पसंती राहिली आहे. २00 ते २५0 किलोमीटर अंतर कापून शेतकरी येथे माल घेऊन येतात. यंदा अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले. त्याचा परिणाम आवकेवर झाल्याचा दिसतो.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात समितीत एक लाख १७ हजार ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यंदा मात्र या महिन्यात ७३ हजार ८५५ क्विंटलच आवक झाली आहे. दरात मात्र मोठी तफावत दिसत असून, गेल्या वर्षी प्रतिक्विंटल सरासरी ७०० रुपये दर होता, तोच यंदा चार हजारांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी समितीत ५००५ कांदा पिशव्यांची आवक झाली. सौद्यात प्रतिक्विंटल दोन हजार ते ११ हजार रुपयांपर्यंत दर पोहोचला. मंगळवारी हाच दर दोन हजार ते १० हजारांपर्यंत राहिला.

मागे रडवले आता हसवले

मागील दोन वर्षे कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली होती. एक रुपये किलोने कांदा विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोकळे गोणपाट घेऊनच घरी जावे लागत होते. गेले महिनाभर मात्र नेहमी रडवणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर थोडे हसू आणल्याचे दिसते.

डिसेंबरअखेर दर तेजीत राहणार

केंद्र सरकारने कांद्याची आयात केली तरीही दरात फारशी घसरण होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत नाही. मुळात कांद्याचे उत्पादनच घटल्याने किमान डिसेंबरपर्यंत दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.

नोव्हेंबरमधील समितीतील कांदा आवक व दरदाम-
महिना             आवक क्विंटल        किमान दर          कमाल दर          सरासरी
नोव्हेंबर २०१८  १,१७,७००             ४०० रुपये              २००० रुपये          ७०० रुपये
नोव्हेंबर २०१९   ७३,८५५               १००० रुपये             १०,१०० रुपये    ४,००० रुपये

गेली वर्ष-दोन वर्षे कांद्याचा भाव पडल्याने कशाचाच ताळमेळ बसत नव्हता; मात्र महिन्याभरापासून दरात थोडी वाढ झाली असून, सध्याचा दर समाधानकारक आहे.
- पंढरीनाथ माने,
माचनूर, मंगळवेढा


अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी पावसाने कांद्याच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झालेली दिसते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.
- मोहन सालपे,
सचिव, बाजार समिती


पावसामुळे कांद्याची पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांकडे मालच नाही. सहा महिन्यांपूर्वी समितीत रोज ५० ते ६० गाड्या कांद्याची आवक होती, ती १0 गाडीवर आली आहे. त्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसामुळे आवक एकदमच मंदावली.
- मनोहर चूग,
कांदा व्यापारी

 

 

Web Title: Kolhapur Bazar Samiti Rs. 3,000 quintal onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.