शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात, 'असे' होणार जागावाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 18:09 IST

भाजपमधून कोणाला संधी मिळणार?

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय मोट बांधण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, काँग्रेस व जनसुराज्य पक्षाला प्रत्येकी तीन जागा देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित सहा पैकी शिवसेना (ठाकरे गट) एक, शिवसेना (शिंदे गट) व भाजपला प्रत्येकी दोन जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.‘शेकाप’ला एक जागा मिळण्याची शक्यता असून आज पॅनलची घोषणा केली जाणार आहे.राज्य व केंद्रात भाजप-शिवसेनेचे सरकार असल्याने बाजार समितीची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन करण्याची भूमिका पहिल्यापासूनच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आहे. आमदार विनय काेरे यांच्या माध्यमातून भाजपसोबत चर्चा सुरु आहे. याबाबत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जागा व उमेदवार निश्चितीचे काम सुरु होते.मुश्रीफ, कोरे, चंद्रकांत पाटील यांच्यात मुंबईत बैठकउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ व आमदार विनय काेरे यांच्यात मुंबईत बैठक झाली असून यामध्ये जागा वाटपावर तोडगा निघाल्याचे समजते.असे होणार जागा वाटप :राष्ट्रवादी काँग्रेस : ६काँग्रेस : ३जनसुराज्य : ३भाजप : २शिवसेना (शिंदे गट) : २शिवसेना (ठाकरे गट) : १शेकाप : १

कोणाला कोणत्या गटातील जागा मिळू शकतात :

विकास संस्था (एकूण जागा ११) : पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड, विनय कोरे, संजय घाटगे, शिवसेना (शिंदे गट, संजय मंडलिक, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर यांच्यापैकी एक जागा), भाजपग्रामपंचायत (एकूण जागा ४) : सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे, संपतराव पवारअडते-व्यापारी (एकूण जागा २) : भाजप व शिवसेना (शिंदे गट)हमाल तोलाईदार : विनय कोरे

भाजपमधून संधी कोणाला मिळणार?भाजपला तीन जागा दिल्या असल्या तरी खासदार धनंजय महाडीक, समरजीत घाटगे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांना संधी मिळू शकते. मात्र इच्छुकांची संख्या पाहिली तर संधी कोणाला द्यायची असा पेच निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजारElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा