कोल्हापूर : उमा टॉकीज रस्त्यावर अपघाताप्रकरणी एस.टी. चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:53 IST2018-12-05T16:52:03+5:302018-12-05T16:53:23+5:30
उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रस्त्यावर भरधाव एस. टी. बसने दुचाकीला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला.

कोल्हापूर : उमा टॉकीज रस्त्यावर अपघाताप्रकरणी एस.टी. चालकावर गुन्हा
कोल्हापूर : उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रस्त्यावर भरधाव एस. टी. बसने दुचाकीला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला.
संशयित चालक अनिल तुकाराम तोडकर (वय ३७, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर गजानन पाटील (वय २१) याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
अधिक माहिती अशी, मयूर पाटील त्याचा मित्र साहिल जीवन कांबळे (२१) असे दोघेजण २० सप्टेंबरला दुचाकीवरून (एमएच ०९ बीएन २२५६) हॉकी स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.
यावेळी गारगोटीकडे जाणाऱ्या एस. टी. बसने (एमएच १२-ईएफ ६६९३) शाहू स्टेडियमजवळ पाठीमागून दुचाकीला धडक दिली. यावेळी मयूरच्या पोटावरून बसचे चाक गेल्याने त्याच्यासह साहिल कांबळे गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मयूरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र शिवरुद्र संकपाळ यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात चालक अनिल तोडकरच्या विरोधात फिर्याद दिली.