शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमसीची’ भिंत-

By admin | Updated: December 19, 2014 00:52 IST

-यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...

आमच्या घराण्यातच फुटबॉल पाचवीलाच पूजला असावा. कारण माझे वडील शंकरराव शिंदे, वडीलबंधू सुहास शिंदे, दुसरे भाऊ सुदर्शन शिंदे आणि आता माझा मुलगा अभिजित शिंदे हे फुटबॉल खेळण्याची परंपरा जपत आले आहेत. कोल्हापूर महापालिकेत दहावीलाच असतानाच फुटबॉलमुळेच नोकरी लागली. महापालिकेच्या केएमसी संघातून खेळताना आम्हाला कधीच प्रेक्षकांचे पाठबळ लाभले नाही. शिवाजी, प्रॅक्टिस, पाटाकडील, बालगोपाल, मर्दानी खेळाचा आखाडा, महाकाली, शाहूपुरी, आदी संघांबरोबर सामना असला की,आम्ही गोल केला तरी टाळ्या वाजवत नसत. मी तर सेंटर बॅक खेळत असल्याने मोठ्या डी च्या बाहेर समोरील संघातील फॉरवर्ड खेळाडूला गोलकीपरपर्यंत जाऊच देत नसे. त्यामुळे मला त्याकाळी ‘केएमसी’ची भिंत असे म्हणत असत. असे अनेक किस्से केएमसीचे माजी फुटबॉलपटू मंगल शिंदे सांगत होते. सत्तरीच्या दशकात सांगली येथे वसंतदादा पाटील यांच्या नावाने मोठी फुटबॉल स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेत वारंवार विचारूनही संयोजक कोणाविरुद्ध कधी सामना आहे, हे सांगू शकत नव्हते. लॉटस् न पाडता समोर येईल त्या संघाबरोबर आम्हाला लढावे लागत होते. तरीही आम्ही सर्व बलाढ्य संघांना पाणी पाजून पुढे जात स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.अंतिम सामन्यात आमची गाठ गोव्याच्या साळगावकर संघाबरोबर पडली. त्यादिवशी कोल्हापुरात छत्रपती शहाजी महाराज यांचे निधन झाले होते. संपूर्ण कोल्हापूर बंद होते. त्यात आमचा सामना मिरजेला म्हटल्याबरोबर कधी नव्हे ते कोल्हापूरचे क्रीडारसिक आमचे पाठराखे म्हणून या स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते. माझ्या संघात सुभाष सरनाईक, प्रकाश पाटील, श्रीनिवास जाधव, बाजीराव मंडलिक, गणपत साठे, भाऊ सरनाईक, दिलीप माने, विलास शिंदे, आदी जिगरबाज खेळाडूंचा भरणा होता. त्यामुळे हा सामना आम्ही अत्यंत अटीतटीने खेळत जिंकलाही.या संघाचा मी कर्णधार असल्याने संघाचा सकाळी चार तास कसून सराव घेत असे. आज फुटबॉल खेळात आधुनिकता आली; मात्र खेळाडूंतील जिगर आणि कसून सराव करायची वृत्ती कमी झाली आहे. त्यामुळे आजचे फुटबॉलपटू काही दिवसांनी खेळ बंद करतानाचे चित्र दिसत आहे.- शब्दांकन: सचिन भोसले