Kolhapur News: आदमापुरातील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:46 IST2023-03-07T12:46:12+5:302023-03-07T12:46:34+5:30

पोलिसांकडून शोध सुरु

Kidnapping of a minor from Balumama temple in Adamapur Kolhapur, incident caught on CCTV camera | Kolhapur News: आदमापुरातील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Kolhapur News: आदमापुरातील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. मुलाचा पोलिस कसून तपास करीत आहेत. याबाबतची फिर्याद सुषमा राहुल नाईकनवरे यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर (ता. खंडाळा) येथील सुषमा राहुल नाईकनवरे या शनिवारी (दि. ४) रोजी सकाळी आपला लहान मुलगा आयुष (वय ६) याला सोबत घेऊन बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.

त्यावेळी मंदिराशेजारील हॉलमधून एक अनोळखी व्यक्ती अंदाजे ५० वर्षांचा पुरुष तसेच अनोळखी महिला अंदाजे ३० वर्षे वयाची यांनी फूस लावून आयुष याला पळवून नेले. आयुषला मोटारसायकलवरून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाले आहे. अधिक तपास भुदरगड पोलिस करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a minor from Balumama temple in Adamapur Kolhapur, incident caught on CCTV camera