Kolhapur: लग्न मोडण्याच्या प्रयत्नातून अपहरण करुन मारहाण, सहा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:20 PM2024-01-19T13:20:05+5:302024-01-19T13:20:38+5:30

लग्न ठरलेल्या मुलीसोबतचे वैयक्तिक मॅसेज लग्न मोडल्यानंतर संबंधित मुलीच्या पतीस पाठवल्याचा गैरसमज

Kidnapped and beaten up in attempt to break up marriage, six arrested in Kolhapur | Kolhapur: लग्न मोडण्याच्या प्रयत्नातून अपहरण करुन मारहाण, सहा अटकेत

Kolhapur: लग्न मोडण्याच्या प्रयत्नातून अपहरण करुन मारहाण, सहा अटकेत

पेठवडगाव : लग्न ठरलेल्या मुलीसोबतचे वैयक्तिक मॅसेज लग्न मोडल्यानंतर संबंधित मुलीच्या पतीस पाठवल्याच्या गैरसमजातून एकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. पोलिसांना तपास करताना त्या मुलीच्या पतीस संदेश पाठवणारा हा तिचा जुना मित्रच असल्याचे उघड झाल्यानंतर नेमका प्रकार उघड झाला. दरम्यान, सोशल मीडियावरून बदनामी, अपहरण व मारहाण प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यातील ६ जणांना अटक झाली असून, त्यांना १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शामराव तुकाराम मुंदाळे (रा. पेठवडगाव), अनिकेत नामदेव धनवडे (रा. दानोळी, ता.शिरोळ), ओंकार मारुती हेंद्रे ( रा. वनवासाची, ता. कराड, जि. सातारा) यांच्यासह मुलीचा भाऊ, पती अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य संशयित हे कडेगाव,पलूस (जि.सांगली) तालुक्यातील आहेत. अपहरण व मारहाण झाल्याची फिर्याद शुभम संतोष खटावकर (रा. पेठवडगाव) याने पोलिसात दिली. यामध्ये संबंधित मुलीसह तिचा पती, दीर, आई, मामा आदी १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, शुभम खटावकर यांचे पलूस येथील एका मुलीबरोबर लग्न होणार होते. मुलगी व तो इन्स्टाग्रामवर बोलत असत. दोघांत परिचय झाल्यानंतर तिने त्यांच्याकडून इन्स्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड घेतला. संबंधित मुलीचा आणखी एक मित्र संपर्कात होता. दरम्यान, संबंधित मुलीने शुभमला विवाहास नकार दिला. २ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर त्यांच्यात व तिच्यात संभाषण होत असल्याचा मेसेज आला. त्याने कल्पना देण्यासाठी मुलीच्या मामाला निरोप देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत मुलीच्या घरच्यांना सोशल मीडियातील मेसेज दाखवत लग्न मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळले. यावरून संतप्त झालेले तिचा भाऊ, मामा, आई, मित्र यांनी शुभम यांचे वडगाव येथून अपहरण करून कडेगाव येथे आणले. येथे त्याचा मोबाइल काढून मारहाण केली. तसेच जबरदस्तीने स्टॅम्प लिहून घेतला. यावेळी संबंधित मुलगी, तिचा पती, दीराने त्याला मारहाण केली.

याबाबत पोलिसांकडे खटावकर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपास केला. मेसेज टाकणाऱ्याला शोधून काढला. त्यानंतर सहा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल एम पठाण यांच्या समोर उभे केले असता,तेरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.

दोघांत तिसरा, मैत्री विसरा

संबंधित मुलीचा विवाह मोडण्यासाठी फिर्यादीचा इन्स्टाग्रामचा वापर करून त्यांचे व तिचे संभाषण (चॅट) नियोजित वरास टाकण्यात आले होते. मुलीची बदनामी करून तिचे लग्न मोडत शुभमला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा डाव अनिकेत धनवडे याने रचला होता. मात्र पोलिसांनी तो उघडकीस आणला.

Web Title: Kidnapped and beaten up in attempt to break up marriage, six arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.