Khelo India Youth Games 2022: उंच उडीत कोल्हापूरच्या अनिकेत मानेला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:38 PM2022-06-07T18:38:56+5:302022-06-07T18:39:19+5:30

गुजरातमधील नंदियाड येथे थोडक्यात सुवर्णपदक हुकले मात्र खेलो इंडीया मध्ये त्याने चुकांची दुरुस्ती करत एकही फॉल न करता स्वतःचे नवीन रेकॉर्ड तयार केले.

Khelo India Youth Games 2022: Kolhapur Aniket Mane wins gold in high jump | Khelo India Youth Games 2022: उंच उडीत कोल्हापूरच्या अनिकेत मानेला सुवर्णपदक

Khelo India Youth Games 2022: उंच उडीत कोल्हापूरच्या अनिकेत मानेला सुवर्णपदक

googlenewsNext

कबनूर : हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी सुरू असलेल्या ४ थ्या खेलो इंडीया युथ गेम्स २०२२ या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिकेत सुभाष माने याने उंचउडीमध्ये सुवर्णपदाची कमाई केली. अनिकेतने नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत २.०७ इतकी उंचउडी मारून सुवर्णपदक पटकाविले. अनिकेतच्या विजयाची बातमी समजताच सोनी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच कबनूर हायस्कूलच्या मैदानावर गुलालाची उधळण करुन पेढे वाटून आनंद साजरा केला.

अनिकेत हरोली तालुका शिरोळ येथील राय या गावचा असून त्याचे शिक्षण कबनूर हायस्कूल येथे पूर्ण झाले. सध्या तो एएससी येथे शिक्षण घेत आहे. कबनूर हायस्कूलमध्ये उंच उडी सरावासाठी संस्थेच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा सराव चांगल्या पद्धतीने झाला व सुवर्णपदकाचे यश संपादन करता आले.

१ सेंटीमीटरने स्वतःचे नवीन रेकॉर्ड

गुजरातमधील नंदियाड येथे २.०६ मीटर इतकी उंचउडी मारून थोडक्यात त्याचे सुवर्णपदक हुकले व ब्राँझ मेडल मिळाले होते. खेलो इंडीया मध्ये त्याने चुकांची दुरुस्ती करत एकही फॉल न करता २.०७ मीटर इतकी उंचउडी मारत १ सेंटीमीटरने स्वतःचे नवीन रेकॉर्ड तयार केले. देशातील अनेक नामवंत वेगवेगळ्या राज्यातील खेळाडूंचे आव्हान मोडून काढत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला पदक तक्त्यात १ सुवर्णपदक मिळवून दिले.

सुवर्णपदक विजेत्यांना भारत सरकारची स्कॉलरशिप

खेलो इंडिया मधील सुवर्णपदक विजेत्यांना भारत सरकारची पाच लाख रुपयेची स्कॉलरशिप जाहिर झाली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने खेलो इंडीया गोल्डमेडल विजेत्या खेळाडूला तीन लाख रुपयाचे बक्षीस तर सिल्वर मेडल विजेत्या खेळाडूला दोन लाख रुपयाचे बक्षीस व ब्राँझ मेडल विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले आहे.

गेली चार वर्षे सराव

अनिकेतला सुरवातीपासून क्रीडा शिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या गेली चार वर्षे तो सराव करत आहे. सध्या तो बेंगलोर या ठिकाणी भारतीय ऑलम्पिक खेळाडू साहना कुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेल प्राधिकरण, साई सेंटर मध्ये सराव करतो आहे.  एएससी कॉलेजचे प्रा.मेजर मोहन वीरकर व प्राचार्य यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Web Title: Khelo India Youth Games 2022: Kolhapur Aniket Mane wins gold in high jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.