शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी निधी वेळेतच देणार : अजित पवार

By संदीप आडनाईक | Updated: August 11, 2024 14:13 IST

नाट्यगृहाची केली पाहणी : होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे आगीत नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवारांनी रविवारी सकाळी नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी उपस्थित कलावंतांशी त्यांनी संवाद साधला. ऐतिहासिक वास्तूचे बारकावे आहे तसेच पुन्हा उभारण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु कामे चांगली होतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर होणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. 

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पवार विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहात आले. प्रारंभी त्यांनी भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. तेथे नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. कलावंत, प्रेक्षक तसेच कोल्हापूरवासियांप्रमाणेच आमच्याही भावना या नाट्यगृहाशी जोडल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते म्हणाले. जाहीर निधीपेक्षा जास्त लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार करण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या.

आराखडा तयार करण्याच्या सूचनापवार यांनी संरक्षक भिंतीचीही पाहणी करून खासबाग मैदानावरील नुकसान झालेल्या रंगमंचाचीही पाहणी केली. एसी नव्याने बसविताना त्याचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा, खासबाग मैदान आणि नाट्यगृहासाठी आवश्यक छताचा पत्रा उत्कृष्ट वापरा, बाहेरील संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने तयार करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम करताना मजबूत, एकसारखे ऐतिहासिक दिसेल अशा पद्धतीने करा. ऐतिहासिक बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्चरची निवड करून त्यांच्याकडून सर्व इमारत जशी आहे तशी दिसेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर