शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

...तर खासगी साखर कारखाने बंद ठेवू

By admin | Updated: July 10, 2015 21:58 IST

माधवराव घाटगे : शासनाने मागण्यांबाबत १५ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्यावा

जयसिंगपूर : देशांतर्गत व जागतिक स्तरावर साखरेचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना चालू हंगामातील ‘एफआरपी’ची रक्कम साखर कारखान्यांना देणे शक्य नाही. त्यामुळे येणारा गळीत हंगाम सुरू करणे अडचणीचे बनले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाबाबत शासनाने १५ आॅगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या गळीत हंगामात खासगी कारखाने सुरू करणार नसल्याची माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) पुणेचे संचालक व श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योग वाचविण्याच्या दृष्टिकोनातून खासगी साखर कारखान्यांच्यावतीने पुणे येथे ‘विस्मा’ संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत साखर उद्योगाबाबत चर्चा करण्यात आली. साखर दर व ऊस किमतीचे व्यस्त प्रमाण हे खरे आजच्या आर्थिक संकटाचे मूळ कारण आहे. २०१४-१५ च्या हंगामामध्ये साखरेचे दर ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल एवढी घसरण झाली. कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेला एफआरपी दर २२०० रुपये ठरला होता. प्रत्यक्षात २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल साखरेला दर मिळाला. सन २०१४-१५च्या हंगामातील कारखान्यांच्या एकूण उत्पन्नातून ७० ते ७५ टक्केरक्कम ऊस किमतीच्या स्वरूपात बहुतेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. त्यामुळे कृषिमूल्य आयोगाच्या व सी. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उर्वरित एफआरपीची रक्कम केंद्र शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.मागील हंगामापेक्षा चालू हंगामासाठी एफआरपी १०० रुपयांनी वाढ धरली असता, साखरेचा दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा कृषिमूल्य आयोगाने गृहीत धरला आहे. मात्र, प्रत्यक्षात साखरेच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या हंगामात साखर कारखाना सुरू करणे अशक्य आहे, असे स्पष्ट करून घाटगे पुढे म्हणाले, तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार न करणे, केंद्र व राज्य शासनाचे कर्ज अर्थसहाय न स्वीकारणे, किमान २० टक्केसाखर दरवर्षी निर्यात करणे, अशा प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला आहे. याबाबत शासनाने १५ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व साखर कारखानदार एकजुटीने त्यास सामोरे जातील, असा इशाराही देण्यात आला. पुणे येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्रातील ८० खासगी साखर कारखानदार व कर्नाटकातील खासगी कारखानदार उपस्थित होते.(प्रतिनिधी)मालतारण मंजूर रक्कम पहिली उचल म्हणून देण्यास शासनाने मंजुरी द्यावीयेत्या हंगामासाठी राज्य सहकारी बॅँक, जिल्हा सहकारी बॅँक व राष्ट्रीयीकृत बॅँका ऊस दरासाठी जी रक्कम मालतारण खात्यावर मंजूर करतील, ती पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांना देण्यास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी द्यावी. तसेच उर्वरित रक्कम साखर विक्रीनंतर हप्त्याहप्त्याने देण्यास मान्यता द्यावी, अशी ‘विस्मा’ची मागणी असल्याचे घाटगे यांनी सांगितले.