नवे घरकुल कोरोनामुक्त ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:19+5:302021-06-16T04:33:19+5:30

कोल्हापूर : महाआवास अभियानांतर्गत मिळालेल्या हक्काच्या घरकुलात प्रवेशाबद्दल तुमचे आभार; पण हे घरकुल कोरोनापासून लांब ठेवा, त्याला उंबरठ्यापर्यंतही फिरकू ...

Keep the new home coronal free | नवे घरकुल कोरोनामुक्त ठेवा

नवे घरकुल कोरोनामुक्त ठेवा

कोल्हापूर : महाआवास अभियानांतर्गत मिळालेल्या हक्काच्या घरकुलात प्रवेशाबद्दल तुमचे आभार; पण हे घरकुल कोरोनापासून लांब ठेवा, त्याला उंबरठ्यापर्यंतही फिरकू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ई-गृहप्रवेश कार्यक्रमांतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात महाआवास अभियानांतर्गत २ हजार ७५७ घरकुले तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी करवीर तालुक्यातील चार लाभार्थ्यांना मंगळवारी या ऑनलाईन कार्यक्रमात चाव्या देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवि शिवदास यांच्या करवीर तालुक्यातील मौजे पासोर्डे येथील वंदना कांबळे, वसगडे येथील प्रकाश गायकवाड, वाशीतील श्रीमती तारूबाई दत्तू पाटील आणि नागरवाडी येथील श्रीमती संगीता गायकवाड यांना घरकुलाच्या चाव्या दिल्या. या वेळी ज्ञानदेव मडके, राजेंद्र जाधव, माया सुर्वे, चंद्रकांत पाटील, राजेंद्र कवडे आदी उपस्थित होते.

फोटो: १५०६२०२१-कोल-घरकुल

फाेटो ओळ : महाआवास अभियानांतर्गत ई-गृहप्रवेश या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाईन चावी प्रदान कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात चार लाभार्थ्यांना अजयकुमार माने व रवि शिवदास यांच्या हस्ते घरकुलाच्या चाव्या दिल्या गेल्या.

Web Title: Keep the new home coronal free