‘केडीसीसी’ची ५७४० कोटी ठेवीपर्यंत झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:23+5:302021-02-05T06:57:23+5:30

(जिल्हा बँकेचा लोगो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) गेल्या पाच वर्षांत ५७४० कोटी ...

KDCC's leap to Rs 5,740 crore | ‘केडीसीसी’ची ५७४० कोटी ठेवीपर्यंत झेप

‘केडीसीसी’ची ५७४० कोटी ठेवीपर्यंत झेप

(जिल्हा बँकेचा लोगो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) गेल्या पाच वर्षांत ५७४० कोटी ठेवीपर्यंत झेप घेतली आहे. पाच वर्षांत तब्बल २४६९ कोटी ठेवीत वाढ झाली असून, गुंतवणुकीतही बँकेने मोठी भरारी घेतली आहे.

जिल्हा बँकेची शुक्रवारी (दि. ५) ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर येथे होत आहे. पाच वर्षांपूर्वी प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात येऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत अत्यंत काटकसरीचा कारभार करत बँक नफ्यात आली. गेल्या पाच वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत बँकेचा दबदबा राज्यात निर्माण केला. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांना बँकेची गाडी नाही, संचालकांचा अभ्यास दौऱ्याचा खर्च अध्यक्ष मुश्रीफ यांनी केला. राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवून त्यांनी काम केल्याने बँक आर्थिक अरिष्टातून बाहेर आली. संचित तोटा कमी करून बँकेला नफ्यात आणले. ठेवींमध्ये पाच वर्षांत तब्बल ५७४० कोटींची वाढ करत असताना गुंतवणूकही त्या पटीत केली. शेतकरी हा बँकेचा कणा असल्याने त्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला, त्याला या सभेत मंजुरी घेतली जाणार आहे.

पाच वर्षांतील बँकेची भरारी -

तपशील ठेवी कर्जे गुंतवणूक निव्वळ नफा सी. आर. ए. आर.

२०१५-१६ ३२७१.६६ कोटी २४४९.१९ कोटी १६२५.९९ कोटी २८.३२ कोटी ७.२० टक्के

२०१९-२० ५७४०.३९ कोटी ४०९९.६१ कोटी २२७६.४६ कोटी ३७.९२ कोटी १२.१८ टक्के

Web Title: KDCC's leap to Rs 5,740 crore