लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:20 IST2022-10-04T17:00:26+5:302022-10-04T17:20:20+5:30

कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे.

Kavita Jadhav murder case, Grandmother needs support along with children | लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

रमेश साबळे

कसबा तारळे : आईचा झालेला खून.. चार वर्षांपूर्वी दुर्धर आजारांने वडिलांचे तर मायेचं छत्र देणार्‍या आजोबांचे दहा वर्षांपूर्वी झाल्याने  निराधार झालेल्या दोन मुली, एक मुलगा तसेच वयोवृद्ध आजी या चार वर्षांपूर्वी सुखवस्तू जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबांला आता समाजाच्या मायेची, आधाराची गरज आहे.

घडलं ते असे, भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील  नारायण जाधव हे मुंबईतील एका कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. स्वतः नारायण जाधव पत्नी तानुबाई, मुलगा प्रमोद आणि दोन मुली या पाच माणसांच्या कुटुंबासह ते येथे राहावयास आले.

त्यानंतर मुलगा प्रमोद याचा विवाह २००० साली खिंडी व्हरवडे येथील कविताशी झाला. यादरम्यान वडिलांनी प्रमोद याला गावातच इलेक्ट्रिकलचे दुकान घालून दिले. या व्यवसायात प्रमोदने अल्पावधीतच चांगला जम बसविला. निवृत्तीनंतर नारायण, तानुबाई यांचे व मुलाचे सर्व काही व्यवस्थित असतानाच सुखी संसारात मिठाचा खडा पडावा तसे घडले. नारायण यांना शारीरिक व्यंग येत मृत्यू झाला आणि प्रमोद व्यसनाच्या आहारी गेला. चांगला  चालत असलेला इलेक्ट्रिक व्यवसाय आतबट्ट्यात आला. चार वर्षांपूर्वी त्याचे कॅन्सरने निधन झाले.

सासर्‍याच्या पाठोपाठ नवऱ्याच्या निधनामुळे हतबल आणि एकाकी पडलेल्या कविताने सर्व संकटांना धीराने सामोरे जात आपल्या टेलरिंग व्यवसायात जम बसवला. थोरली मुलगी गीताली हीला बारावीनंतर महागाव (गडहिंग्लज) येथील डी फार्म्ससीला दोन वर्षांपूर्वी घातले. दोन नंबरची मुलगी श्रुती (वय१६) दहावीत तर मुलगा साहिल(वय १३)पाचवीत शिक्षण घेत आहे. कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे. आज संपूर्ण दिवसभर तिन्ही मुलं आजीच्या कुशीत कावरीबावरी होऊन बसली होती. सेवाभावी संस्था समाजातील दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन एका उद्ध्वस्त कुटूंबाला धीराबरोबरच आधार देण्याची गरज आहे.

Web Title: Kavita Jadhav murder case, Grandmother needs support along with children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.