शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा तालीम प्रभागात काटाजोड लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पूर्वीच्या कोल्हापूरचा बाज असलेला मध्यमवर्गीय दाट वस्तीचा व पंचगंगा नदी किनाऱ्यालगतचा प्रभाग म्हणून पंचगंगा तालीम प्रभाग (क्रमांक ...

कोल्हापूर : पूर्वीच्या कोल्हापूरचा बाज असलेला मध्यमवर्गीय दाट वस्तीचा व पंचगंगा नदी किनाऱ्यालगतचा प्रभाग म्हणून पंचगंगा तालीम प्रभाग (क्रमांक ५०) ची ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागात मातब्बरांमध्येच लढत होत आहे. तगडे उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथील निवडणूक निश्चितच चुरशीची होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांसह इतरांनीही येथे ताकद पणाला लावली आहे.

पंचगंगा नदीकिनारा, मस्कुती तलाव, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठेतील काही भाग, दुधाळी नाला, शिंगणापूर नाका असा भाग आहे. पंचगंगा तालीम प्रभागात गत निवडणुकीत सर्वसाधारण महिला आरक्षण होते. त्यामुळे इच्छुकांचा पत्ता कट झाला. काहींनी पत्नीला या निवडणुकीत रिंगणात उतरविले. यामध्ये राष्ट्रवादीच्या माधवी प्रकाश गवंडी, वैशाली सतीश पाटील, दीपा दीपक काटकर यांच्यात चुरशीची लढत झाली. यात माधवी गवंडी यांनी मैदान मारले.

आतापर्यंत महापालिकेत गवंडी कुटुंबीयांनी पाचवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात आनंदराव गवंडी यांनी तीन, तर प्रकाश गवंडी व त्यांच्या पत्नी माधवी गवंडी यांनी प्रत्येकी एकवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात संघर्ष होता. अशा स्थितीत माधवी गवंडी यांनी महापौरपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली.

यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे पुन्हा खुल्या प्रवर्गातील अनेकांचे पत्ते कट झाले. सध्या या प्रभागातून प्राथमिक स्तरावर सात ते आठजण इच्छुक आहेत. यामध्ये प्रकाश गवंडी यांचा समावेश आहे. केलेल्या कामाच्या जोरावर ते रिंगणात उतरले आहेत.

गतनिवडणुकीत कमी मतांनी पराभूत झालेल्या दीपा काटकर यांचे पती दीपक काटकर यांनी कंबर कसली आहे. ते उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमचे अध्यक्ष व जयविजय तरुण मंडळ आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. शेती व चांदी मूर्ती बनविण्याचे ते काम करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते सामाजिक कार्यात आहेत. कोरोना, पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. उद्योजक अरुण पाटील-घरपणकर हेही इच्छुक आहेत. मागील वेळी त्यांच्या भावजय वैशाली पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यांच्यासह रियाज बागवान हे इच्छुक असून ते शिवसेनेतून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी नगरसेवक सुरेश सुतार, मोहसीन मणेर, माजी आमदार मालोजीराजे यांचे जवळचे कार्यकर्ते दीपक ऊर्फ भाऊ लक्ष्मण घोडके यांच्यासह सात ते आठजण इच्छुक असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक -५०, विद्यमान नगरसेविका माधवी गवंडी

आताचे आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते,

माधवी प्रकाश गवंडी - (राष्ट्रवादी) - १७७१

वैशाली सतीश पाटील (भाजप) - ७८१

दीपा दीपक काटकर - (अपक्ष)- ७४६

स्वाती किरण घाटगे (शिवसेना) - ४३९

शोभा शिवाजी डोंगळे ( काँग्रेस) - १४७

शिल्लक असलेली कामे,

-गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था

- पापा बाॅईजच्या मागील बाजूची शौचालयांची दुरावस्था

-पंचगंगा घाटावर भाविकांसाठी सुविधांचा अभाव

- जय-विजय मंडळाच्या मागील बाजूची महापालिकेची मोकळी जागा विकसित झालेली नाही.

- महापालिकेचा ग. गो. जाधव सांस्कृतिक हाॅल दुरावस्था

प्रभागात झालेली कामे,

- रजपूत गल्ली सुनील राबाडे ते संजय माळी घराकडे जाणारा रस्ता पॅसेज क्राँक्रिट

- उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम चौक स्टेज सुधारणा

- काटकर घर ते चैतन्य तरुण मंडळ गटर काम पूर्ण

- म्हसोबा गल्ली येथे गटार काम पूर्ण

-पंचगंगा नदीघाट येते दान गणपती परिसराचे डांबरीकरण

- कागदी गल्ली ते डाॅ. बुलबुले दवाखाना गटर काम पूर्ण

कोट

गेल्या पाच वर्षांत सुमारे दोन कोटींची कामे केली आहेत. या कामातून नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय महापौरपदाचा कालावधीत महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा ठराव सभागृहात मंजूर केला.

- माधवी प्रकाश गवंडी

नगरसेविका

फोटो : १५०२२०२१-कोल-पंचगंगा प्रभाग

आेळी : कोल्हापुरातील पंचगंगा तालीम प्रभागांतर्गत येणाऱ्या गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. (छाया : नसीर अत्तार)