शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावडा, लाईन बझार मस्जिदीची शंभरी पार

By admin | Updated: July 9, 2015 00:30 IST

करवीर तालुक्यात ६० प्रार्थनास्थळे : सर्वत्र धार्मिक कार्यक्रमाची लगबग--महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

रमेश पाटील- कसबा बावडा -पवित्र रमजान महिन्यात रोजे, नमाज, तरावीह पठण याद्वारे अल्लाहची मर्जी, आशीर्वाद मिळविण्यात प्रत्येक मुस्लिम बांधव मग्न असल्याचे चित्र कसबा बावड्यासह करवीर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील लहान-मोठ्या ६० मस्जिदींमधून नमाज पठण होते.कोल्हापूर शहराचे उपनगर असलेल्या कसबा बावड्याच्या मध्यवर्ती भागात १०० वर्षांपूर्वीची शाही जामे मस्जिद आहे. समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून त्याची डागडुजी करण्यात आली आहे. कसबा बावड्याचे अमिरसाब म्हणून रुस्तम पठाण हा पदभार सांभाळत आहेत. मस्जिद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेरअली हवालदार, उपाध्यक्ष जावेद नदाफ, सदस्य जावेद खान, मुस्ताक मोमीन, नजीर शेख, राजेखान शेख, ताजुद्दीन मुल्ला, सिकंदर इनामदार, आब्बास नदाफ हे मस्जिदीचे कामकाज पाहत आहेत. शब्बीर सुलतान मोमीन हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.लहान मुलांच्या धार्मिक शिक्षणासाठी मक्तब घेतला जातो. तो सायंकाळी ७ ते ८ या वेळेत असतो. पवित्र रमजान महिन्यात या मस्जिदीमध्ये नमाज, तरावीह पठण, दुवा होते. ईद दिवशी इदगाहवर नमाज पठण केली जाते. लाईन बझार येथेही सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली लाईन बझार सुन्नत मुस्लिम जमियत मस्जिद आहे. येथेही रमजान महिन्यात रोजे, नमाज, तराविह पठण होत आहे. दादासाहेब सय्यद या मस्जिदीचे अध्यक्ष आहेत. उचगाव येथे १९९५ च्या काळातील जुनी जामा मस्जिद आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात जामा मस्जिद येथे चार ते साडेपाचशे मुस्लिम बांधव नमाज, तरावीह पठण करतात. मणेरमळा, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, याठिकाणी मस्जिदी आहेत. दिलावरभाई सय्यद, दस्तगीर मुजावर, बाबासो मुल्लाणी, उल्फत मुल्ला, मुबारक सनदी, मकबुल गुलाब मुल्लाणी, हाफीज शोएब साहब, जहांगीर मकानदार, बालेचाँद कुरणे हे जामा मस्जिदीचे ट्रस्टी आहे. तालुक्यातील वडणगे, खुपिरे, केर्ले, वाकरे, कोपार्डे, आदींसह इतर गावांतील लहान-मोठ्या मस्जिदींमधून तरावीह, नमाज पठण, आदी धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम बांधव व्यस्त दिसत आहेत.