शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

करवीरची पीक परिस्थिती एकदम ‘झकास’

By admin | Updated: August 22, 2014 22:05 IST

भात पोटरीच्या अवस्थेत : सोयाबीन फुलाय लागलाय, भुईमुगाला सुटू लागल्या आऱ्या

कसबा बावडा : करवीर तालुक्यातील खरिपाची पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. धुळवाफेवर पेरलेले भात आता पोटरीला आले आहे. सोयाबीन फुलाय लागलाय. भुईमूग आऱ्या सुटणेच्या अवस्थेत आहे. उसाची उंची चांगलीच वाढली असून, पेरे हाताच्या मनगटासारखी झाली आहेत. एकंदरीत करवीरमधील पीक परिस्थिती इतर तालुक्यांच्या तुलनेत एकम ‘झकास’अशीच आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप सर्वत्र दिल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. खरिपाची पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर पाने खानाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अशी परिस्थिती असताना करवीरची पीक परिस्थिती मात्र उत्तम राहिली आहे.करवीर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पिके चांगलीच वाढली आहेत. तसेच जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकाला पाऊस उघडला तरी पाण्याची गरज भासली नाही. तसेच कडकडीत पडलेल्या उन्हाचा पिकांच्या वाढण्यावर परिणाम झाला. याउलट इतर तालुक्यांतील स्थिती झाली. मुळातच पाऊस कमी पडल्याने व जमिनीतील ओलावा कमी झाल्याने व उन्हाचा तडाका वाढल्याने पिके कोमेजू लागली. मात्र, करवीर याला अपवाद ठरला. (प्रतिनिधी)ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करासध्या अनेक तालुक्यांतील पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. हा ओलावा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलकी कोळपणी करावी व माती पिकाच्या मुळाशी लावावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.पावसाच्या उघडिपीने जमिनीतील ओलावा कमी होतो व उष्णता वाढते. त्यामुळे पिकांवर आळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांवर अशा प्रकारच्या आळ्या दिसल्यास ताबडतोब योग्य ती औषध फवारणी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने करावी आणि पिके वाचवावीत.- डी. बी. पाटील,करवीर तालुका कृषी अधिकारी.