करवीर भाजप तर्फे कोविड सेंटरना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:10+5:302021-05-31T04:19:10+5:30

सडोली खालसा : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने औचित्य साधून करवीर ...

Karveer BJP distributes literature to Kovid Center | करवीर भाजप तर्फे कोविड सेंटरना साहित्य वाटप

करवीर भाजप तर्फे कोविड सेंटरना साहित्य वाटप

सडोली खालसा : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने औचित्य साधून करवीर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला करण्यात आला. तसेच कुडित्रे, शिंगणापूर, कुरुकली येथील येथील कोविड सेंटरना साहित्य वाटप करण्यात आले.

कोरोना रुग्णांना कोविड केअर व अलगीकरण केंद्र उभारणी तसेच अशा केंद्रांवर मेडिकल किट, उपकरणे, मास्क, फेसशिल्ड अशी साधने पुरविणे तसेच कोविड सेंटर व अलगीकरण केंद्राचे ठिकाणी नाष्टा, पौष्टिक अल्पोपहार, फळे वाटप करणे असे कार्यक्रम पक्षातर्फे राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजप करवीर तालुका अध्यक्ष हंबीरराव पाटील-हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुकली, कुडित्रे शिंगणापूर या कोविड केअर सेंटरवर पौष्टिक आहार व फळे वाटप कार्यक्रम करण्यात आले.

कार्यक्रमास भाजप सहकार सेल जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, भोगावती कारखाना संचालक दत्तात्रय मेडसिंगे, दिव्यांग आघाडी सेल जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, कृष्णात भोसले, मारुती बुवा, सरपंच विमला सुतार, उपसरपंच बाजीराव पाटील, बी. वाय. लांबोरे, सागर भोगम, संजय शेलार, एम. आर. पाटील, सचिन पाटील, नवनाथ पोवार, उत्तम गाडवे, उत्तम देसाई, जितेंद्र पाटील, सुशीला पाटील, शिवाजी देसाई, रामचंद्र देशमुख, आनंदराव चौगले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक व आभार दयानंद कांबळे यांनी मानले.

३० करवीर भाजप वाटप

फोटो ओळ

करवीर तालुका भाजप पक्षाच्या वतीने कुरुकली ता. करवीर येथील कोविड सेंटरला साहित्य प्रदान करताना हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडसिंगे.

Web Title: Karveer BJP distributes literature to Kovid Center