शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात उद्योजकांना 'बुरे दिन'

By admin | Updated: May 28, 2015 00:59 IST

मुरगेश निराणी : राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत, काँग्रेस सरकारमुळे उद्योगवाढीला ब्रेक

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर महाराष्ट्रातील उद्योजकांना कर्नाटकात या म्हणून एकिकडे कर्नाटक सरकार पायघड्या घालत असताना दुसरीकडे कर्नाटकातील उद्योजक राज्यात पुरेशा दर्जेदार सेवासुविधा मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना ‘बुरे दिन’ आले आहेत. परिणामी, बाहेरच्या राज्यात जाण्याच्या मानसिकतेत ते आहेत. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.निराणी एका कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. त्यावेळी त्यांच्याशी बातचित केली. गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक कर्नाटकात जाण्याचा इशारा देत आहेत; त्यामुळे कर्नाटकात उद्योगवाढीचे धोरण काय, असे विचारले असता ते म्हणाले, कर्नाटकात भाजप सत्तेवर असताना उद्योजकांना चांगले दिवस होते. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना हत्तरगी (ता. हुक्केरी) जवळ ‘एसईझेड’मध्ये मोठा आयटी उद्योग आला आहे. सलग तीन वर्षे आम्ही बंगलोरमध्ये जागतिक स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन (मेळावा) भरविला होते. जिल्हानिहाय कोणते उद्योग चालू शकतात, याचा आराखडा तयार केला होता. इच्छुक उद्योजकांना भूखंडही दिले होते. दरम्यान, सन २०१३ मध्ये कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला अन् उद्योगवाढीला ब्रेक लागला. आम्ही तयार केलेला आराखडा धूळ खात पडून आहे. राज्यात नवे मोठे उद्योग आणण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत; त्यामुळे कर्नाटकातील उद्योजक नाराज आहेत. पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना ‘बुरे दिन’ आले आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक बाहेरच्या राज्यांत जाण्याच्या मानसिकतेत आहेत. नव्या साखर कारखान्यांना परवाना नकोकारखानदारी वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढत आहे. साखरेचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी पुढील पाच वर्षांत नव्या साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन, सहविद्युत प्रकल्प अशा माध्यमांतून अडचणीतील साखर उद्योगाला सावरणे शक्य आहे, असेही निराणी यांनी सांगितले.