कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:13 IST2022-07-23T16:03:45+5:302022-07-23T16:13:00+5:30
कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत

कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी
अमर पाटील
कळंबा : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे इशारा पातळीकडे गेलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता ओसरली आहे. मात्र, पावसाने उसंत घेतलेली असली तरी कळंबा तलाव आज, शनिवारी 'ओव्हरफ्लो' झाला. तलाव भरून सांडव्या वरून ओसंडून वाहू लागल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दुपारनंतर याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहिला होता. यंदा जुलैमध्ये पावसाने हुलकावणी दिली तर जूनच्या मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी पंचवीस फुटांवर पोहोचली होती. अखेर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला.