शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...

By संतोष कनमुसे | Updated: November 17, 2025 19:22 IST

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत, विधानसभा निवडणुकीत हायहोल्टेज ठरलेला कागल विधानसभा मतदार संघात आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ कट्टर विरोधक कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.  

भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत निवडणूक लढवणार आहेत. 

दरम्यान, आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. या आघाडीमुळे संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा विश्वासघात होणार नाही, असंही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. तर मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

मुश्रीफ यांनी काढलेल्या पत्रकात काय आहे?

आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

'माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन, असा विश्वास मुश्रीफ यांनी दिला.

'माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे. सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरुन कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही, असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले.

याबाबत; मंगळवार दि. 18 रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत. दरम्यान; कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती (हीस्ट्री रीपीट्स) झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. कै. शामराव भिवाजी पाटील व कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब, कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व कै. विक्रमसिंहराजे घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरुन कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु यामध्ये "ईडी" ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. "देर आये... दुरुस्त आये.....", असंही मुश्रीफ यांनी पत्रकार म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif and Ghatge Unite in Kagal; Apologizes to Sanjaybaba Ghatge

Web Summary : Hasan Mushrif and Samarjit Ghatge, political rivals in Kagal, have joined forces for the upcoming Nagar Parishad elections. Mushrif apologized to Sanjaybaba Ghatge's supporters, assuring them their trust wouldn't be betrayed and promising increased support.
टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेNCPराष्ट्रवादी काँग्रेस