फक्त डायल करा नं. १०९० ला, पोलीस येतील मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:32+5:302021-04-28T04:24:32+5:30

कोल्हापूर : कोरोना संकटात ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पोलीस दलाने हेल्पलाइन क्र. १०९० ...

Just dial no. In 1090, the police will come to the rescue | फक्त डायल करा नं. १०९० ला, पोलीस येतील मदतीला

फक्त डायल करा नं. १०९० ला, पोलीस येतील मदतीला

कोल्हापूर : कोरोना संकटात ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पोलीस दलाने हेल्पलाइन क्र. १०९० सुरू केला आहे. या हेल्पलाइनचा प्रारंभ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. हेल्पलाइनकडे गरजू ज्येष्ठ नागरिकांचा फोन आल्यास पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी तातडीने धावून जाणार आहे.

कोल्हापूर शहरामध्ये सुमारे ३५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे पत्ते, फोन नंबर चारही पोलीस ठाण्याकडे नोंद आहेत. त्याशिवाय नोंदणीकृत नसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक शहरात आहेत. आयुष्यभर नोकरी अगर काबाडकष्ट करून वृद्धापकाळासाठी ठेवलेली आर्थिक पुंजी अनेकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करून त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीस लावले. ही मुले लग्न झाल्यानंतर पाखरासारखी उडून गेली. अशा अवस्थेत अनेक वृद्ध आई-वडिलांसमोर एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे. मुले चौकशीच करत नाहीत, खर्चाला पैसे पाठवत नाहीत, अगर पैसे असूनही मदतीसाठी मुले जवळ नाहीत अशी अनेक वृद्धांची परिस्थिती आहे. त्यातच कोरोना प्रार्दुभावामुळे त्यांच्या मनात धास्ती वाढत आहे. या धास्तावलेल्या, असुरक्षिततेची भावना वाढलेल्या मनाला फुंकर घालून त्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य उमटावे, या उद्देशाने शहरातील जुना राजवाडा पोलिसांनी कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे, त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबविण्याचा आदेश अधीक्षक बलकवडे यांनी दिला. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून पोलीस दलाने जिल्ह्यातील ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस हेल्पलाइन’ सुरू केली आहे.

त्यांनी १०९० या हेल्पलाइन नंबरवर ज्येष्ठ नागरिकांनी फोन केल्यास त्यांच्या मदतीला पोलीस धावून जाणार आहेत, अशी माहिती गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांनी दिली.

Web Title: Just dial no. In 1090, the police will come to the rescue