शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांचीही आंदोलनात उडी

By admin | Updated: August 19, 2015 00:22 IST

संपाचा २९ वा दिवस : किमान वेतनाचे ‘क्लेम’चे दावे दाखल करणार

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या पाठोपाठ आता यंत्रमाग कामगार संघटनांनी सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. किमान वेतनातील फरकासाठी क्लेम अ‍ॅप्लिकेशनचे दावे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी २९ व्या दिवशीसुद्धा सायझिंग कामगारांचा संप सुरूच राहिला.शासनाने यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सुधारित किमान वेतन २९ जानेवारीला घोषित केले. तब्बल २९ वर्षांनी निघालेल्या परिपत्रकाप्रमाणे किमान वेतन मिळावे, अशी मागणी करीत राज्यातील यंत्रमाग केंद्रातील कामगार संघटनांनी विविध आंदोलने केली. मात्र, त्यास शासन प्रतिसाद देत नसल्याने २१ जुलैपासून लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने बेमुदत संप केला. यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळत नसल्याने ८० टक्के कारखाने पडून दररोज होणारी सुमारे शंभर कोटी रुपयांची कापड खरेदी-विक्री ठप्प झाली. आता तर वस्त्रनगरीस आर्थिक टंचाईने ग्रासले आहे.अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील यंत्रमाग संघटनांच्या कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन सहा महिन्यांचा किमान वेतनातील फरक, तसेच चार तासांचा ओव्हर टाईम पगार मागण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे स्पष्ट केले. सायझिंग कारखाने बंद असल्याने यंत्रमाग कारखानेसुद्धा बंद पडले आहेत. यंत्रमाग कारखान्यांमधील कामगारांना बंदच्या काळातील दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशीही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते दत्तात्रय माने यांनी दिली.शासनाने जाहीर केलेले सुधारित किमान वेतन दहा हजार ५७३ रुपये असून, कामगारांना महिन्याला तीन ते चार हजार रुपये कमी मिळतात. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांचा असलेला फरक प्रत्येक कामगारासाठी १८ हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे. आठ तासांऐवजी बारा तासाची पाळी कामगारांना असल्याने ओव्हर टाईमचे किमान साठ हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी कामगारांची आहे. अशा प्रकारचे किमान वेतनातील फरकाचे आणि ओव्हर टाईमच्या रकमेची मागणी करणारे दावे सहायक कामगार आयुक्तांकडे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट करून कामगार नेते माने म्हणाले, सध्याच्या वाढत्या महागाईत महिन्याला १५ हजार रुपये किमान वेतन मिळावे. मात्र, किमान वेतनाचा फरक व ओव्हर टाईम मिळण्यासाठी आता कामगारांना संपाचे हत्यार उपसावे लागणार आहे. त्यासाठी २२ आॅगस्टला सकाळी दहा वाजता थोरात चौकातील बाजार शेडमध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, आॅटोलूम कामगार, वहिफणी कामगार यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.पत्रकार परिषदेसाठी इंटकचे शामराव कुलकर्णी, आयटकचे मारुती आजगेकर, राजेंद्र निकम, कामगार कल्याण संघाचे धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, जॉबर संघटनेचे परशराम आगम, नवक्रांती कामगार संघटनेचे बंडोपंत सातपुते, रघुनाथ तेजम, उपस्थित होते. (प्रतिनिधी)अंतरिम वेतनवाढ स्वीकारून सायझिंग सुरूयेथील थोरात चौकामध्ये झालेल्या सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या सभेमध्ये ज्या सायझिंग कारखान्यांच्या मालकांकडून कामगारांना सन्मानाने बोलावून वेतनवाढीची चर्चा केली जाईल. तेथे उच्च न्यायालयातील निकाल लागेपर्यंत अंतरिम वेतनवाढ म्हणून पगार घेतला जाईल आणि संबंधित सायझिंग कारखाने चालू करण्यात येतील, अशी माहिती कामगार नेते ए. बी. पाटील यांनी दिली. यावेळी मारुती जाधव, सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, आदींची भाषणे झाली.