शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाकडून चार लाख किमतीचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे करणी काढण्याचे सांगून रोख रकमेसह सोन्याचे दागिने अशा सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत ...

अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे करणी काढण्याचे सांगून रोख रकमेसह सोन्याचे दागिने अशा सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी पृथ्वीराज यशवंत जाधव (रा. मिरज) याच्याकडून कुरुंदवाड पोलिसांनी साडे आठ तोळ्याचे (अंदाजे किंमत चार लाख) दागिने जप्त केली. फसवणिकीची फिर्याद जोत्सा उत्तम पालकर (रा. अब्दुललाट) या महिलेने दिली होती.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी जाधव याने फिर्यादी पालकर व त्यांच्या आई मंगल यांना घरात कोणीतरी करणी केल्याचे सांगून व त्याला बंधन करण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या आईकडून वेळोवेळी १ लाख ३५ हजार रुपये रोख व १ लाख ३४ हजार रुपयांचे दागिने फसवून घेतले होते. बंधन निघताच सोने परत करण्याचा विश्वास दिला होता. वर्ष उलटले तरी सोने व पैसे परत न केल्याने फिर्यादिने कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला मिरजेतून अटक केली होती. करणीच्या नावावर अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.

इंचलकरंजी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव महामुणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश मुंगसे, अमित प्रधाने, सागर खाडे यांचा समावेश होता.

फोटो - अब्दुललाट ता. शिरोळ येथे करणीची भीती घालून फसवणूक केलेला संशयित आरोपी पृथ्वीराज जाधव याच्यासह त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, उपनिरीक्षक अमित पाटील आदी.