लाटवडे, खोची, बुवाचे वाठारात प्रचाराची ईर्षा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:32+5:302021-01-13T05:00:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : लाटवडे, खोची, बुवाचे वाठार ग्रामपंचायतीसाठी प्रचारात चांगलीच रंगत आली असून, ईर्षा, जोश वाढू ...

लाटवडे, खोची, बुवाचे वाठारात प्रचाराची ईर्षा वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : लाटवडे, खोची, बुवाचे वाठार ग्रामपंचायतीसाठी प्रचारात चांगलीच रंगत आली असून, ईर्षा, जोश वाढू लागला आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीला प्राधान्य देत मत अन् मत टिपण्यासाठी सर्वच जण वॉर्ड पिंजून काढीत आहेत.
लाटवडे येथे युवकांनी एकत्र येत नृसिंह युवक क्रांती आघाडी स्थापन केली आहे; तर विरोधात ज्येष्ठ नेत्यांची नृसिंह महाविकास आघाडी आहे. या दोन्ही आघाड्यांत लढत होत असून १५ जागांसाठी पाच प्रभागांत ३१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग तीनमध्ये एक अपक्ष आहे. नृसिंह युवक क्रांती आघाडीचे नेतृत्व अमर पंडित पाटील, युवराज पाटील, किरण माळी, अशोक माळी करीत आहेत. त्यांना वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. शहाजी पाटील यांची महत्त्वपूर्ण साथ आहे. युवकांनी प्रचाराची यंत्रणा गतीने राबविली आहे; तर नृसिंह महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे संभाजी पवार, माजी उपसरपंच दिनकर पाटील, शिवाजीराव पाटील करीत आहेत.
खोची येथे १३ जागांसाठी तीन पॅनेलमध्ये अटीतटीची लढाई आहे. येथील युती व आघाडी पाहता नेत्यांच्या सोयीच्या भूमिकेची मतदार मात्र आश्चर्याने चर्चा करीत आहेत. प्रभाग तीनमधील नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढत आहे. पॅनेलचे नेते व त्यांचे नातेवाईक येथे उभे आहेत. भैरवनाथ युवा शेतकरी महाविकास आघाडीचे नेतृत्व वारणा दूध संघाचे संचालक दीपक पाटील, राष्ट्रवादीचे प्रा. बी. के. चव्हाण, पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील करीत आहेत. स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील करीत आहेत. युवक क्रांती विकास आघाडीचे नेतृत्व माजी उपसरपंच अमरसिंह पाटील करीत आहेत. माजी सरपंच वैशाली पाटील यांचे पती सुनील पाटील प्रभाग एकमधून अपक्ष लढत आहेत.
बुवाचे वाठार येथे ११ जागांसाठी पारंपरिक दोन गटांत दुरंगी लढत होत आहे. उद्धवराज महाराज ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व भीमराव शिंदे, संपतराव पाटील, गुणधर मडके, बाळासाहेब पाटील, शेखर बुवा हे करीत आहेत; तर उद्धवराज ग्रामविकास महाआघाडीचे नेतृत्व शंकर शिंदे, सुनील चौगुले, दिलावर सुतार, दिनकर शिंदे, मदन अनुसे करीत आहेत.