शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 10:06 IST2019-08-11T09:59:31+5:302019-08-11T10:06:48+5:30

रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला

JCB test to release vehicles, still three-and-a-half feet over Shiroli bridge | शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी

शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी

ठळक मुद्देरविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला

कोल्हापूर -: पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार दिवसांपासून बंद असून  आज रविवारी सकाळीही परिस्थिती जैसे थेच आहे.मात्र प्रशासनाने  जेसिबी पाण्यात घातला असुन वाहने सोडण्यासाठी चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक आज सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, चाचणी पूर्ण झाली असून वाहतूक सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. 

रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला, तेव्हा  ९.३० वाजता शिरोली उड्डाण पुलावर  पुराच्या पाण्याची पातळी अजूनही साडेतीन फुट होती. हे पाणी संथ गतीने उतरत आहे.
 

Web Title: JCB test to release vehicles, still three-and-a-half feet over Shiroli bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.