शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरोग्य’ योजनेपासून जयसिंगपूर वंचित ?

By admin | Updated: August 30, 2015 23:03 IST

पाठपुराव्याची गरज : लोकसंख्येच्या मर्यादेमुळे योजनेस अडचणी

संदीप बावचे - जयसिंगपूर   --लोकसंख्येच्या कारणावरून केंद्र शासन पुरस्कृत ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’पासून जयसिंगपूर शहर वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून दोन वेळा शासनाच्या आरोग्य विभागकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एक लाख लोकसंख्या असेल तरच ही योजना मंजूर होवू शकते असे, शासन पातळीवर सांगण्यात येत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज बनली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त असून केंद्राच्या सूचनेनुसार ज्या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ५० हजारांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येतो. जयसिंगपूर शहराशी बहुतांश गावे निगडीत असल्यामुळे व्यापारी, शेतकरी, कामगार औषधोपचारासाठी येतात. सध्या शहर व परिसरातील नागरिकांची आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता खासगी वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम) राबविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत ठराव केला होता. सरासरी ५० हजार लोकसंख्येला एक अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर, असे या योजनेचे स्वरूप असून. एक वैद्यकीय अधिकारी, तर प्रत्येक दहा हजार लोकसंख्येला एक उपआरोग्य केंद्र व लॅबोरेटरी स्टोअर, स्वतंत्र कर्मचारी, नर्स, क्लार्क, आदीं असे नियोजन आहे. योजना शासकीय खर्चातून चालविली जाते. औषध पुरवठा केंद्र शासनाकडून होतो. या योजने अंतर्गत आरोग्य केंद्रात सुसज्ज लॅबोरेटरी, बाह्यरूग्ण सेवा, एक्स रे, औषधोपचार व पुरवठा केंद्र, तसेच दर आठवड्यास स्त्री रोग व बाल रोग तज्ज्ञ असे स्वरूप आहे. या योजनेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांचे नियंत्रण असते. योजनेसाठी जयसिंगपूर पालिकेने आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. योजना कोणासाठी ?१५ आॅक्टोंबर २०१३ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी योजना पुरस्कृत केली. शहर व ग्रामीण विभागासाठी कार्यान्वित करण्यात आली. नंतर शहरातील झोपडपट्टी, कामगार वसाहतीमधील नगारिकांसाठी तसेच कचरा गोळा करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योजना शहरी भागात कार्यान्वित करण्यात आली आहे.प्रस्ताव लालफितीतराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ही योजना सध्या इचलकरंजी शहरात सुरू आहे. या धर्तीवरच जयसिंगपूर शहरात ही आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्याकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. ५0 हजारांसाठी एक केंद्रएक लाख लोकसंख्येसाठी दोन केंद्रे, असे शासनाचे धोरण आहे. शहराची लोकसंख्या ५० हजार गृहीत धरून एका केंद्राची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे. एक लाख लोकसंख्ये प्रमाणेच ही योजना मिळू शकते, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.