शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 12:53 IST

उत्कर्षा पोतदार  उत्तूर : स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेजबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या ...

उत्कर्षा पोतदार उत्तूर : स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेजबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ प्रकल्प ता. आजरा येथे प्रकल्पग्रस्त न्याय मागण्यासाठी जलसमाधी घेण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना  अडवले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. गेली २५ वर्षे हे आंदोलन चालू आहे. या प्रकल्पात ८२२ प्रकल्पग्रस्त आहेत.त्यातील ३५५ शेतकऱ्यांनी धरण बांधण्यासाठी सहकार्य करून स्वेच्छेने जमिनी दिल्या. त्यांना लाख ते दीड लाख रुपये  नुकसान भरपाई दिली व ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला त्यांना हेक्टरी ३५ लाख रुपये भरपाई मिळाली आहे. वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणूनच प्रशासनाच्या या कार्यवाहीच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त आले होते. आंबेओहळ धरणस्थळावर आजरा तहसीलदार समीर माने,  सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, दिनेश खट्टे,  कार्यकारी अभियंता शिल्पा राजे मगदूम, पाटबंधारे उप विभागीय अधिकारी आदिनाथ फडतरे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय धोंडपोटे व  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तसेच आपत्ती व्यवस्थापन फायर व्यवस्थापन व आरोग्य पथकाला तयारीत ठेवण्यात आले होते. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, पी एस खरात उपस्थित होते.यावेळी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय येजरे, शंकर पावले, पांडुरंग पाटील, ज्योतिबा गुरव, अंबाजी पाटील, नामदेव पाटील, अजित बेलवेकर, समीर भोई, रमेश जाधव, राजेंद्र शिंदे, शिवराम देसाई व मोठ्या संख्येने शेतकरी महिला उपस्थित होत्या.आम्ही जगून तरी काय करायचं ?आम्ही जगून तरी काय करायचंय ? शेती धरणात गेली आहे. हृदयाचे ऑपरेशन झाल्यामुळे महिन्याला दोन हजार रुपयांची औषधे लागतात. आमच्याकडे पैसे नाहीत. पैसा कोठून आणायचा. - आनंदा विठोबा मेंगाणे धरणग्रस्त आरदाळबैठकीचे आश्वासन..अधिवेशन संपल्यानंतर पुण्याला जाऊन प्रस्ताव घेऊन मुंबईमध्ये पुनर्वसन मंत्री व कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलनHasan Mushrifहसन मुश्रीफguardian ministerपालक मंत्री