शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ज्येष्ठांना पीएच.डी. संशोधनाची संधी - डॉ. भूषण पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:55 PM

ज्येष्ठ नागरिक केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय, शिक्षण, आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)

ठळक मुद्देयुजीसी सकारात्मक : शिवाजी विद्यापीठात बैठक

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय, शिक्षण, आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) सकारात्मक आहे. यासंदर्भातील आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन दिली.

शिवाजी विद्यापीठातील अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख आणि संचालक यांच्याशी शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.डॉ. पटवर्धन म्हणाले, राष्ट्रीय महत्त्वाचे उपक्रमही हाती घेण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेषत: मानव्यविद्या, भाषा, भाषाविज्ञान यांसारख्या विद्याशाखांसाठीही भरघोस तरतूद करून त्यासंदर्भातील संशोधनाला चालना देण्याचे धोरण ‘युजीसी’ने स्वीकारले आहे.

क्रेडिट गुण...विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ प्रवेशित शिक्षण संस्थेबरोबरच सुटीच्या कालावधीत अन्य ठिकाणांहून जरी एखादा अभ्यासक्रम केला, तर त्याचे क्रेडिट गुण त्याला मिळावेत, यासाठी नॅशनल अकॅडेमिक क्रेडिट बँक हा एक अभिनव उपक्रम युजीसीच्या विचाराधीन असल्याचेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.नामफलकाचे अनावरणबैठकीनंतर डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या उद्यानात त्यांच्या हस्ते नारळाचे रोप लावण्यात आले. यावेळी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अधीक्षक जाधव उपस्थित होते.

 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठाने आजपर्यंत युजीसीच्या विविध उपक्रम, प्रकल्पांत सक्रिय सहभाग दर्शविला आहे. येथून पुढील काळातही नूतन उपक्रमांतही हिरीरिने सहभागी होईल.प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी स्वागत व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, व्ही. टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर