शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर संघ उपांत्य फेरीत

By admin | Updated: January 20, 2015 00:22 IST

सुवर्णचषक हॉकी स्पर्धा : कोल्हापूरही अंतिम चारमध्ये; आज फायनल

इस्लामपूर : मातोश्री सुभद्रा डांगे फौंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत यजमान डांगे फौंडेशनसह छावा आणि महाराष्ट्र कोल्हापूर व कोल्हापूर पोलीस या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या (मंगळवारी) सकाळी उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर दुपारी अंतिम सामना होईल.येथील पोलीस कवायत मैदानावर तीन दिवसांपासून मातोश्री सुभद्रा डांगे सुवर्णचषक हॉकी स्पर्धा सुरु आहेत. उद्या (मंगळवारी) स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. विजेत्या संघाला २१ हजार रुपये आणि सुवर्णचषक, तर उपविजेत्यांना ११ हजार रुपये आणि रौप्यचषक दिला जाणार आहे. आजच्या दिवसभरातील सामन्यांतून अमित शिपुरे (कोल्हापूर पोलीस), कपिल मोरे (छावा, कोल्हापूर), स्वप्निल थोरात (तिरंगा, नूल) व सागर ढेरे (मातोश्री, इस्लामपूर) हे ‘सामनावीर’ पुरस्काराचे मानकरी ठरले.उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना कोल्हापूर पोलीस विरुद्ध दिग्विजय नाईक फौंडेशन इचलकरंजी यांच्यात झाला. पोलीस संघाने हा सामना एक-शून्य असा जिंकला. छावा कोल्हापूरने चार-शून्य अशा फरकाने कोल्हापूरच्या श्याम स्पोर्टस्चा पराभव केला. महाराष्ट्र कोल्हापूरने नूलच्या तिरंगा स्पोर्टस्वर मात केली. तसेच यजमान डांगे फौंडेशनने सातारा संघाचा पराभव केला. उद्या (मंगळवारी) सकाळी साडेआठला डांगे फौंडेशन विरुध्द छावा कोल्हापूर आणि महाराष्ट्र कोल्हापूर विरुध्द कोल्हापूर पोलीस यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील. सागर जाधव, मुश्ताक खाटीक, योगेश देशपांडे यांनी पंच म्हणून, तर अनिल शिंदे, रोहित पवार यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)