कोल्हापुरात लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा उत्साहात; ५०० स्पर्धकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:52 IST2025-10-06T11:51:39+5:302025-10-06T11:52:46+5:30
१.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप

कोल्हापुरात लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा उत्साहात; ५०० स्पर्धकांचा सहभाग
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने रविवारी ‘लोहपुरुष’ ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा राजाराम तलाव येथे झाली. आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज कुमार, पोलिस कमांडट प्रशांत अमृतकर यांच्या उपस्थितीत स्पर्धांना प्रारंभ झाला. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे आयर्नमॅन चेतन चव्हाण आणि रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर, आयर्नमॅन डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप पाटील, एस. आर. पाटील, गोरख माळी, आदित्य शिंदे, महेश शेळके, आशिष तंबाके तसेच तगडा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
१.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप होते. याला ट्रायथलॉन असे म्हटले जाते. डूएथलॉनमध्ये केवळ रनिंग आणि सायकलिंगचा समावेश होता.
स्पर्धेत विविध गटात पुरुषृत संजय खिलारी, मिलिंद कामटे, प्रिया पंडित, एमडी जेल यास दाफेदा, ज्योती सुकटणकर, आदित्य अमित सोनवणे, रक्षिता भिनगे, तेजस अमीन, रुचिरा साळवी, केतन शाह, वैशाली जाधव, ऋषिकेश पाटील, पायल प्रशांत पाटील, राज कोरगावकर, विभावरी सप्रे, अतिश खोत, वेदांत धवल राज, आदित्य म्हात्रे, डॉ. यामिनी काळे, अर्जुन गुप्ता, पृथ्वीराज पवार देसाई, राहुल शिरसाट, प्रीतम असरानी, केएससी हाफ आयर्न रिले ट्रायथलॉन ऑल ए इ एस सांगली यांनी विजेतेपद पटकावले.