संजीवनी अभियानात साडेपाच हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:41+5:302021-05-31T04:18:41+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने रविवारी संजीवनी अभियानाअंतर्गत ५७२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात ४७१ व्याधीग्रस्त नागरिकांपैकी १२ नागरिक ...

Investigation of five and a half thousand citizens in Sanjeevani Abhiyan | संजीवनी अभियानात साडेपाच हजार नागरिकांची तपासणी

संजीवनी अभियानात साडेपाच हजार नागरिकांची तपासणी

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने रविवारी संजीवनी अभियानाअंतर्गत ५७२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात ४७१ व्याधीग्रस्त नागरिकांपैकी १२ नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेत.

यावेळी ५३६८ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ५७ नागरिक आढळून आले. तर ९११ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५४ वैद्यकीय पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. भक्ती पूजानगर, आठ नंबर शाळा, विद्यार्थी कामगार चौक, शाहूनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, मातंग वसाहत, दुधाळी, गवत मंडई, तोरस्कर चौक, लक्ष्मीगल्ली, पिवळावाडा, कसबा बावडा, लाईन बझार, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साइक्स एक्स्टेशन, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळ, रुईकर कॉलनी, वर्षानगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, राजोपाध्येनगर, कनेरकरनगर, जाधववाडी, सदरबाजार, सिद्धार्थनगर, जिवबा नाना जाधवपार्क येथे हे अभियान राबविण्यात आले.

Web Title: Investigation of five and a half thousand citizens in Sanjeevani Abhiyan