मजरेवाडी ग्रा.पं.तील गैरव्यवहाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:52+5:302021-02-06T04:42:52+5:30

दत्तवाड : मजरेवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायत यांच्याकडून माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंचवार्षिक कालावधीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. ...

Investigate the malpractices in Majrewadi village | मजरेवाडी ग्रा.पं.तील गैरव्यवहाराची चौकशी करा

मजरेवाडी ग्रा.पं.तील गैरव्यवहाराची चौकशी करा

दत्तवाड : मजरेवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायत यांच्याकडून माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंचवार्षिक कालावधीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती अमर बुबनाळे यांनी दिली आहे. दलित वस्ती सुधारणा, चौदावा वित्त आयोग, त्याचबरोबर ग्रामनिधी अशा विविध माध्यमातून मिळालेल्या निधीचा योग्य विकासकामांसाठी विनियोग न करता वारंवार एकच काम करून त्यासाठी अनेकदा निधी खर्च केला गेला आहे. काही बाबतींत विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले असून त्यासाठीही मोठा खर्च केला आहे. मात्र, हे साहित्य गावात कोठेही दिसून येत नाही. विविध कामे केवळ नावालाच दाखवून निधी खर्च केला आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून येत आहे. काही वेळेस टेंडर नोटीस न काढताही बेकायदेशीर कामे करून निधी लाटला गेला आहे. ग्रामसेवकांचाही या सर्व बाबतीत हातखंडा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करून प्रत्यक्षात झालेली कामे, खर्च केलेला निधी याची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुबनाळे यांनी केली आहे.

Web Title: Investigate the malpractices in Majrewadi village