शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या गुरुवारी मुलाखती

By admin | Updated: August 30, 2015 00:26 IST

दोन्ही आघाड्यांच्या बैठका : भाजप-ताराराणीचा हायटेक प्रचार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच आघाड्या, पक्षांकडे रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या वतीने गुरुवारी व शुक्रवारी (दि. ३ व ४ सप्टेंबर) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत शनिवारी रात्री आमदार हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीत निवडणुकीचा आढावा घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक दोन महिन्यांवर असली तरी अगोदरच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने या निवडणुकीने चांगलाच रंग भरला आहे. पक्ष-आघाडींकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, ‘जनसुराज्य’चे प्रा. जयंत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, भैया माने, उत्तम कोराणे यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. प्रभावी नगरसेवकांचा प्राधान्याने विचार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्या तरी गेल्या पाच वर्षांत प्रभागात प्रभावी काम केलेल्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांच्या प्रभागात आरक्षण जाहीर झाले आहे, त्यांच्या कुटुंबीयांचाही विचार केला जाणार असल्याचे समजते. ‘भाजप-ताराराणी’चा १५ दिवस प्रचारावर भर भाजप-ताराराणी आघाडीने दि. १५ सप्टेंबरपर्यत फक्त विविध मार्गांनी प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत घेतला आहे. ३१ आॅगस्ट रोजी ‘प्रतिसंवाद,’ तर त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मतदारांना सोशल मिडीया व निवेदन वाटप यांद्वारे प्रचार यंत्रणा राबविणार असल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीत ठरले. याशिवाय दोन दिवसांत आघाडीची होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले.