शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ६० लाखांची वाहने जप्त; कोल्हापूर-साताऱ्यातील सराईत चोरटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:24 IST

चेसीस, नंबरप्लेट बदलून विक्री

कोल्हापूर : बनावट चावीने चोरलेली वाहने कर्नाटकात नेऊन विकणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील दोन सराईत वाहन चोरट्यांसह कर्नाटकातील तिघांकडून पोलिसांनीचोरीतील तीन ट्रक, तीन कार, एक बोलेरो पिकअप आणि पाच दुचाकी अशी सुमारे ६० लाखांची १२ वाहने जप्त केली. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.नागेश हणमंत शिंदे (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), संतोष बाबासो देटके (४०, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा), मुस्तफा सुफी महंमद (५०, रा. सेकंड क्रॉस, जनता कॉलनी, टुमकुर, जि. बेंगलोर), करीम शरीफ शेख (६४, रा. पी. एच. कॉलनी, टुमकुर) आणि इमामसाब रसुलसाब मुलनवार (४५, रा. कुरटपेटी बेटगिरी, जि. गदग) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. वाहन चोरीतील ही सराईत टोळी असून, त्यांच्यावर महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हे दाखल आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेताना अंमलदार रामचंद्र कोळी आणि सुरेश पाटील यांना रेकॉर्डवरील सराईत चोरटा नागेश शिंदे याने काही वाहनांची चोरी केल्याचे समजले होते. तो एका मित्रासह चोरीतील टेम्पो विक्रीसाठी शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि. ६) सापळा रचून शिंदे आणि त्याचा साथीदार संतोष देटके याला पोलिसांनी ताब्यात घेतले.टेम्पोबद्दल चौकशी केल्यानंतर तो शिरोली एमआयडीसी येथून चोरल्याची त्यांनी कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी आणखी काही वाहने चोरून कर्नाटकात गदग आणि टुमकुर परिसरात विकल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा छडा लावून कर्नाटकातील तिघांना अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी चोरीतील तीन ट्रक, तीन कार, एक बोलेरो पिकअप आणि पाच दुचाकी जप्त केल्या. अधिक तपास उपनिरीक्षक शेष मोरे करीत आहेत.येथून चोरली वाहनेया टोळीने शिरोली एमआयडीसी, राजारामपुरी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शाहूपुरी, कागल आणि गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक वाहन चोरले. शिरोळ आणि शहापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून प्रत्येकी दोन वाहने चोरली. तर कुर्डूवाडी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक वाहन चोरल्याची कबुली दिली.

चेसीस, नंबरप्लेट बदलून विक्रीनागेश शिंदे आणि संतोष देटके हे दोघे चोरलेली वाहने कर्नाटकातील गदग आणि टुमकुर येथे घेऊन जायचे. तिथे वाहनांचे चेसिस नंबर आणि नंबर प्लेट बदलून बनावट कागदपत्र तयार केली जायची. त्यानंतर चोरीतील वाहनांची पुढे विक्री केली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीने चोरीतील शेकडो वाहने विकली असावित असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस